Psalms 93

Inizia questo capitolo con l'AI

Chiedi all’IA di questo capitolo

Rimani nel testo e chiedi del movimento, tensione, sfondo e cosa rivela questo capitolo nel libro più ampio.

1 परमेश्वर राज्य करतो. त्याने ऐश्वर्याचा झगा घातला आहे; परमेश्वराने सामर्थ्याचे वस्र घातले आहे; त्याने सामर्थ्यासारखा कमरपट्टा कसला आहे. जगही असे मजबूत स्थापले आहे, ते हालवले जाऊ शकत नाही. 2 तुझे राजासन प्राचीनकाळापासून स्थापलेले आहे; तू सर्वकाळापासून आहेस. 3 हे परमेश्वरा, महासागरांनी आवाज उंचावला आहे; आपला आवाज उंचावला आहे, महासागराच्या लाटा आदळतात आणि गर्जना करतात. 4 खूप जलांच्या, महासागराच्या प्रचंड लाटांच्या गर्जनेहून उच्चस्थानी असलेला परमेश्वर अधिक सामर्थ्यवान आहे. 5 तुझे नियम अतिसत्य आहेत; हे परमेश्वरा, तुझ्या घराला पवित्रता सदासर्वकाळ शोभते.

Trasforma la lettura in vero studio

Registrati per salvare versetti, prendere note e studiare con strumenti AI.

Scegli il tuo prossimo passo dopo questo capitolo Continua a leggere, scegli un piano o continua a studiare con l'AI.
Segui i temi che questo capitolo apre Argomenti correlati per le domande più ampie che questo capitolo potrebbe aver aperto.