Psalms 75

Inizia questo capitolo con l'AI

Chiedi all’IA di questo capitolo

Rimani nel testo e chiedi del movimento, tensione, sfondo e cosa rivela questo capitolo nel libro più ampio.

1 आसाफाचे स्तोत्र हे देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो; आम्ही धन्यवाद देतो, कारण तू आपले सान्निध्य प्रगट करतो; लोक तुझी आश्चर्यकारक कृत्ये सांगतात. 2 नेमलेल्या समयी मी योग्य न्याय करीन. 3 जरी पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व राहणारे सर्व भितीने कापत आहेत, मी पृथ्वीचे खांब स्थिर करीन. 4 मी गर्विष्ठांना म्हणालो, गर्विष्ठ होऊ नका, आणि दुष्टांना म्हणालो, आपल्या विजयाविषयी धिटाई करू नका. 5 विजयाविषयी इतकी खात्री बाळगू नका; आपले डोके उंच करून बोलू नका. 6 विजय पूर्वेकडून नव्हे, पश्चिमेकडून किंवा रानातूनही येत नाही. 7 पण देव न्यायाधीश आहे; तो एकाला खाली करतो आणि दुसऱ्याला उंच करतो. 8 कारण परमेश्वराने आपल्या हातात फेसाळलेला पेला धरला आहे, त्यामध्ये मसाला मिसळला आहे आणि तो ओतून देतो. खात्रीने पृथ्वीवरील सर्व दुर्जन शेवटल्या थेंबापर्यंत पितील. 9 पण तू काय केले हे मी नेहमी सांगत राहीन; मी याकोबाच्या देवाला स्तुती गाईन. 10 तो म्हणतो, मी दुष्टांची सर्व शिंगे तोडून टाकीन, पण नितीमानाची शिंगे उंच करीन.

Trasforma la lettura in vero studio

Registrati per salvare versetti, prendere note e studiare con strumenti AI.

Scegli il tuo prossimo passo dopo questo capitolo Continua a leggere, scegli un piano o continua a studiare con l'AI.
Segui i temi che questo capitolo apre Argomenti correlati per le domande più ampie che questo capitolo potrebbe aver aperto.