Psalms 58

Inizia questo capitolo con l'AI

Chiedi all’IA di questo capitolo

Rimani nel testo e chiedi del movimento, tensione, sfondo e cosa rivela questo capitolo nel libro più ampio.

1 दाविदाचे स्तोत्र अहो अधिकाऱ्यांनो, तुम्ही खरोखर योग्य न्याय करता का? अहो मनुष्याच्या मुलांनो, तुम्ही सरळपणे न्याय करता का? 2 नाही, तुम्ही हृदयात दुष्टपणाचे काम करता; तुम्ही पृथ्वीवर आपल्या हाताने हिंसा तोलून देता. 3 दुष्ट उदरापासूनच दुरावतात; ते जन्मल्यापासूनच खोटे बोलून बहकून जातात. 4 त्यांचे विष सापाच्या विषासारखे आहे, जो बहिरा असल्यासारखा साप आपले कान झाकतो त्याच्यासारखे आहेत; 5 गारुडी कितीही कुशलतेने मंत्र घालू लागला तरी त्याच्या वाणीकडे तो लक्ष देत नाही, त्यासारखे ते आहेत. 6 हे देवा, त्यांचे दात त्यांच्या मुखात पाड; हे परमेश्वरा तरुण सिंहाच्या दाढा पाडून टाक; 7 जसे जोरात वाहणारे पाणी नाहीसे होते तसे ते नाहीसे होवोत; जेव्हा ते आपले तीर मारतील तेव्हा त्यांना टोक नसल्यासारखे ते होवोत. 8 गोगलगायीप्रमाणे ते होवोत जशी ती विरघळते आणि नाहीशी होते, जर अवेळी जन्मलेल्या स्रीचा गर्भ त्यास कधी सूर्य प्रकाश दिसत नाही त्याप्रमाणे ते होवोत. 9 तुमच्या भांड्यास काटेऱ्या जळणाची आंच लागण्यापूर्वीच, ते हिरवे असो वा सुकलेले, दुष्ट नाहीसे होतील. 10 नीतिमान जेव्हा देवाने घेतलेला सूड पाहील तेव्हा तो आनंदित होईल; तो आपले पाय दुष्टांच्या रक्तात धुईल. 11 म्हणून मनुष्य म्हणेल, “खरोखर नीतिमान मनुष्यांना त्यांचे प्रतिफळ आहे; खरोखर पृथ्वीवर न्याय करणारा देव आहे. खरोखर आहे.”

Trasforma la lettura in vero studio

Registrati per salvare versetti, prendere note e studiare con strumenti AI.

Scegli il tuo prossimo passo dopo questo capitolo Continua a leggere, scegli un piano o continua a studiare con l'AI.
Segui i temi che questo capitolo apre Argomenti correlati per le domande più ampie che questo capitolo potrebbe aver aperto.