Psalms 142

Inizia questo capitolo con l'AI

Chiedi all’IA di questo capitolo

Rimani nel testo e chiedi del movimento, tensione, sfondo e cosa rivela questo capitolo nel libro più ampio.

1 दाविदाचे स्तोत्र मी आपल्या वाणीने परमेश्वरास आरोळी मारतो; मी आपल्या वाणीने परमेश्वराची प्रार्थना करतो. 2 मी आपला विलाप त्याच्यासमोर ओततो; त्यास मी आपल्या समस्या सांगतो. 3 जेव्हा माझ्याठायी माझा आत्मा व्याकुळ झाला, तेव्हा तू माझा मार्ग जाणला. ज्या मार्गात मी चाललो, त्यामध्ये त्यांनी माझ्यासाठी पाश मांडला आहे. 4 माझ्या उजवीकडे न्याहाळून पाहा, कारण तेथे माझ्याविषयी कोणी पर्वा करत नाही. मला कशाचाही आश्रय नाही; माझ्या जिवाची काळजी घेणारा कोणीच नाही. 5 हे परमेश्वरा, मी तुला आरोळी मारतो; मी म्हणतो, तू माझा आश्रय आहेस, जिवंताच्या भूमित तू माझा वाटा आहेस. 6 माझ्या आरोळीकडे लक्ष दे, कारण माझी फार दुर्दशा झाली आहे; माझा छळ करणाऱ्यांपासून मला सोडीव, कारण ते माझ्यापेक्षा बलवान आहेत. 7 मी तुझ्या नावाची उपकारस्तुती करावी, म्हणून माझा जीव बंदीतून काढ. नितीमान माझ्याभोवती जमतील, कारण तू माझ्याशी चांगला आहेस.

Trasforma la lettura in vero studio

Registrati per salvare versetti, prendere note e studiare con strumenti AI.

Scegli il tuo prossimo passo dopo questo capitolo Continua a leggere, scegli un piano o continua a studiare con l'AI.
Segui i temi che questo capitolo apre Argomenti correlati per le domande più ampie che questo capitolo potrebbe aver aperto.