1 Samuel 11

Inizia questo capitolo con l'AI

Chiedi all’IA di questo capitolo

Rimani nel testo e chiedi del movimento, tensione, sfondo e cosa rivela questo capitolo nel libro più ampio.

1 मग नाहाश अम्मोनी याने जाऊन याबेश-गिलादास वेढा घातला. तेव्हा याबेशांतल्या सर्व मनुष्यांनी नाहाशाला म्हटले, “आम्हाशी करार कर म्हणजे आम्ही तुझी सेवा करू.” 2 तेव्हा नाहाश अम्मोनी त्यांना म्हणाला, “मी तुम्हाशी अशा अटीवर करार करीन की, मी तुम्हातील प्रत्येकाचा उजवा डोळा फोडून सर्व इस्राएलाची मानहानी करीन.” 3 तेव्हा याबेशच्या वडिल जनांनी त्यास म्हटले, “आम्हांला सात दिवसाचा अवकाश दे, म्हणजे इस्राएलाच्या सर्व प्रातांत आम्ही दूत पाठवू. मग जर आम्हास सोडवायला कोणी येत नसला, तर आम्ही बाहेर तुझ्याकडे येऊ.” 4 आणि त्या दूतांनी शौलाच्या गिब्याकडे येऊन या गोष्टी लोकांच्या कानावर घातल्या; तेव्हा सर्व लोक मोठ्याने आवाज काढून रडू लागले. 5 आणि पाहा शौल शेतातून गाईबैलांच्या मागून चालत येत होता. शौल म्हणाला, “लोकांस काय झाले? म्हणून ते रडत आहेत?” तेव्हा त्यांनी त्यास याबेशातील माणसे काय म्हणाली ते सांगितले. 6 तेव्हा शौलाने या गोष्टी ऐकल्यावर देवाचा आत्मा जोराने त्याच्यावर आला आणि त्याचा राग फारच भडकला. 7 मग बैलांची जोडी घेऊन त्याने त्यांचे तुकडे तुकडे केले आणि दूतांच्या हातून ते इस्राएलाच्या सर्व प्रांतात पाठवून सांगितले की, “जो कोणी शौलामागे व शमुवेलाच्यामागे येत नाही त्याच्या बैलांना असे करण्यात येईल.” तेव्हा परमेश्वराचे भय लोकांवर पडले व ते एक मनाचे होऊन एकत्र होऊन निघाले. 8 मग जेव्हा त्याने बेजेकात त्यांची नोंद केली, तेव्हा इस्राएलाचे लोक तीन लाख होते, आणि यहूदाचे लोक तीस हजार होते. 9 तेव्हा जे दूत आले होते त्यांना त्यांनी म्हटले, “याबेश-गिलादाच्या मनुष्यांना असे सांगा की, उद्या सूर्य तापेल तेव्हा तुमची सुटका होईल.” मग दूतांनी जाऊन याबेशाच्या मनुष्यांना तसे सांगितले; तेव्हा ते आनंदीत झाले. 10 मग याबेशांतील माणसे नाहाशाला म्हणाली, “उद्या आम्ही बाहेर तुम्हाकडे येऊ तेव्हा तुम्हास बरे दिसेल तसे आमचे करा.” 11 मग सकाळी असे झाले की शौलाने लोकांच्या तीन टोळ्या केल्या आणि त्यांनी पहाटेच्या प्रहरी छावणीमध्ये येऊन दिवस तापे पर्यंत अम्मोन्यांवर हल्ला केला आणि त्यांचा पराभव केला. आणि असे झाले की, जे उरले त्यातले दोन देखील एकत्र एका ठिकाणी राहिले नाहीत, जे वाचले त्यांची पांगापांग झाली. 12 मग लोक शमुवेलाला म्हणाले, “शौल आम्हावर राज्य करील काय? असे जे बोलले ते कोण आहेत? ती माणसे काढून दे, म्हणजे आम्ही त्याना जिवे मारू.” 13 तेव्हा शौल बोलला, “आज कोणाही मनुष्यास जिवे मारायचे नाही कारण आज परमेश्वराने इस्राएलास सोडवले आहे.” 14 तेव्हा शमुवेलाने लोकांस म्हटले, “चला आपण गिलगालास जाऊन तेथे नव्याने राज्य स्थापन करू.” 15 मग सर्व लोक गिलगालास गेले आणि गिलगालात त्यांनी परमेश्वराच्यासमोर शौलाला राजा केले आणि तेथे परमेश्वराच्यासमोर त्यांनी शांत्यर्पणांचे यज्ञ अर्पण केले; तेव्हा तेथे शौल व इस्राएलाची सर्व माणसे यांना फार आनंद झाला.

Trasforma la lettura in vero studio

Registrati per salvare versetti, prendere note e studiare con strumenti AI.

Scegli il tuo prossimo passo dopo questo capitolo Continua a leggere, scegli un piano o continua a studiare con l'AI.
Segui i temi che questo capitolo apre Argomenti correlati per le domande più ampie che questo capitolo potrebbe aver aperto.