Nehemiah 11

Bu bölümü AI ile başlat

Bu bölüm hakkında AI'ye sor

Metinde kal ve hareket, gerilim, arka plan ve bu bölümün daha büyük kitap içinde ne açığa çıkardığı hakkında sor.

1 इस्राएली लोकांचे नेते जे यरूशलेम नगरात राहत होते आणि बाकीच्या लोकांपैकी दहातल्या एकाने पवित्र यरूशलेम नगर येथे रहावे आणि उरलेल्या नऊ जणांनी आपापल्या गावी वस्ती करावी असे ठरवण्यासाठी चिठ्ठ्या टाकल्या. 2 आणि जे लोक स्वखुशीने यरूशलेमेमध्ये राहायला तयार झाले. त्यांना लोकांनी आशीर्वाद दिले. 3 जे प्रांताचे अधिकारी यरूशलेमात राहिले ते हेच होते. पण काही इस्राएल लोक, याजक, लेवी, मंदिराचे सेवेकरी व शलमोनाच्या सेवकांचे वंशज यहूदातील आपआपल्या नगरामध्ये व वतनात राहत होते. 4 यरूशलेमेमध्ये काही यहूदी आणि बन्यामीनी घराण्यातील व्यक्ती राहत होत्या. यरूशलेमामध्ये आलेले यहूदाचे वंशज पुढीलप्रमाणेः उज्जीयाचा पुत्र अथाया, जखऱ्याचा पुत्र, अमऱ्याचा पुत्र आणि अमऱ्या शफाट्याचा. शफाट्या महललेलचा. महललेल हा पेरेसचा वंशज. 5 बारूखचा पुत्र मासेया (बारुख हा कोल-होजचा पुत्र, कोलहोजे हजायाचा पुत्र, हजाया अदायाचा, अदाया योयारीबचा, योयारीब जखऱ्याचा आणि जखऱ्या शिलोनीचा पुत्र.) 6 पेरेसचे सर्व पुत्र जे यरूशलेमामध्ये राहत होते त्यांची संख्या चारशे अडुसष्ट होती. हे सर्व शूर पुरुष होते. 7 यरूशलेमामध्ये राहायला गेलेले बन्यामीनचे वंशज असेः मशुल्लामचा पुत्र सल्लू (मशुल्लाम योएदाचा पुत्र, योएद पदायाचा, पदाया कोलायाचा पुत्र, कोलाया मासेयाचा, मासेया ईथीएलचा आणि ईथीएल यशायाचा) 8 यशायाच्या पाठोपाठ गब्बई आणि सल्लाई होते. ते एकंदर नवशे अठ्ठावीस जण होते. 9 जिख्रीचा पुत्र योएल त्यांचा प्रमुख होता आणि हसनुवाचा पुत्र यहूदा, हा यरूशलेम नगराचा दुय्यम अधिकारी होता. 10 याजकांपैकीः योयारीबचा पुत्र यदया, याखीन, 11 हिल्कीयाचा पुत्र सराया (हिल्कीया मशुल्लामचा पुत्र, मशुल्लाम सादोकाचा, सादोक मरायोथचा, मरायोथ अहीटूबचा. अहीटूब देवाच्या मंदिराचा अधिक्षक होता.) 12 आणि त्यांचे आठशे बावीस भाऊबंद मंदिराचे काम करत होते. आणि यरोहामाचा पुत्र अदाया (यरोहाम पलल्याचा पुत्र. पलल्या अम्सीचा, जखऱ्याचा पुत्र, जखऱ्या पशहूरचा आणि पशहूर मल्कीयाचा). 13 मल्कीयाचे दोनशे बेचाळीस हे सर्वजण आपापल्या पितृकुळांचे प्रमुख होते अजरेलचा पुत्र अमशसइ अजरेल अहजईचा पुत्र, अहजई मशिल्लेमोतचा, मशिल्लेमोथ इम्मेरचा 14 आणि इम्मेरचे एकशे अठ्ठावीस हे सर्व शूर सैनिक होते. हगदोलीमचा पुत्र जब्दीएल त्यांचा अधिकारी होता. 15 लेवी पुढीलप्रमाणेः हश्शूबचा पुत्र शमाया, हश्शूब अज्रीकामचा पुत्र, अज्रीकाम हशब्याचा, हशब्या बुन्नीचा 16 शब्बथई आणि योजाबाद हे दोघे लेव्यांचे प्रमुख होते आणि देवाच्या मंदिराबाहेरच्या कारभाराचे ते प्रमुख होते. 17 मत्तन्या, हा मीखाचा पुत्र मीखा जब्दीचा आणि जब्दी आसाफचा. आसाफ गानवृंदाचा प्रमुख होता. ईशस्तुती आणि प्रार्थनागीते म्हणताना तो आरंभ करी व लोक पाठोपाठ म्हणत व बकबुक्या भाऊबंदांमध्ये त्याचा अधिकार दुसरा होता आणि शम्मूवाचा पुत्र अब्दा, शम्मूवा गालालाचा पुत्र, गालाल यदूथूनाचा 18 या पवित्र नगरात दोनशे चौऱ्याऐंशी लेवी राहायला गेले. 19 यरूशलेमामध्ये गेलेले द्वारपाल असेः अक्कूब, तल्मोन आणि त्यांचे भाऊबंद एकशे बहात्तर होते. 20 बाकीचे इस्राएली लोक आणि याजक तसेच लेवी यहूदाच्या वेगवेगळया नगरांमध्ये आपापल्या वडिलोपार्जित वतनांमध्ये राहिले. 21 मंदिराचे सेवेकरी ओफेल टेकडीवर राहत. सीहा आणि गिश्पा हे या सेवेकऱ्यांचे प्रमुख होते. 22 बानीचा पुत्र उज्जी हा यरूशलेममधील लेवीचा प्रमुख होता. बानी हशब्याचा, हशब्या मत्तन्याचा, मत्तन्या मीखाचा पुत्र. उज्जी हा आसाफचा वंशज. आसाफचे वंशज गायक असून देवाच्या मंदिरातील सेवेची जबाबदारी त्यांच्यावर होती. 23 ते राजाज्ञा पाळत. गायकांनी दररोज काय करायचे ते आज्ञेत सांगितलेले असे. 24 राजाचा हुकूम काय आहे हे पथह्या लोकांस सांगत असे. पथह्या हा मशेजबेल याचा पुत्र. मशेजबेल जेरहच्या वंशातला होता. जेरह यहूदाचा पुत्र. 25 यहूदातील काही लोक ज्या खेड्यात आणि आपल्या शेतामध्ये राहत ती अशीः किर्याथ-आर्बात व त्याच्या आसपासची खेडी. दिबोन आणि त्याच्या भोवतालची खेडी. यकब्सेल आणि त्या भोवतालची खेडी, 26 आणि येशूवा, मोलादा, बेथ-पेलेत ही नगरे व त्यांच्या आसपासची खेडी, 27 हसर-शुवाल, बैर-शेबा आणि त्यांच्या भोवतालची खेडी. 28 सिकलाग, मकोना व त्यांच्या भोवतालची गावे, 29 एन-रिम्मोन, सरा, यर्मूथ 30 जानोहा, अदुल्लम ही नगरे आणि त्यांच्या आसपासची खेडी, लाखीश आणि त्याच्या भोवतालची शेतीवाडी, अजेका आणि त्याभोवतीची खेडी. अशाप्रकारे यहूदाचे लोक बैर-शेबापासून हिन्नोमच्या खोऱ्यापर्यंतच्या भागात राहत होते. 31 गिबातील बन्यामीनच्या कुळातले वंशज मिखमाश, अया, बेथेल ही नगरे व त्या भोवतालची खेडी 32 अनाथोथ, नोब, अनन्या, 33 हासोर, रामा, गित्तइम, 34 हादीद, सबोइम, नबल्लट, 35 लोद, ओना आणि कारागिरांचे खोरे येथे राहत होते. 36 लेवीच्या कुळातील यहूदाचे काही गट बन्यामीनांच्या प्रदेशात गेले.

Okumayı gerçek bir çalışmaya dönüştür

Ayet kaydetmek, not almak ve YZ destekli araçlarla çalışmak için kayıt ol.

Bu bölümden sonraki adımınızı seçin Okumaya devam et, bir plan seç veya AI ile çalışmaya devam et.
Bu bölümün açtığı temaları takip et Bu bölümün açmış olabileceği daha büyük sorular için ilgili konu merkezleri.