Job 32

Bu bölümü AI ile başlat

Bu bölüm hakkında AI'ye sor

Metinde kal ve hareket, gerilim, arka plan ve bu bölümün daha büyük kitap içinde ne açığa çıkardığı hakkında sor.

1 नंतर या तीन मनुष्यांनी ईयोबाला उत्तर देण्याचे थांबविले, कारण तो त्याच्या स्वतःच्या नजरेमध्ये नितीमान होता. 2 नंतर राम घराण्यातील बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याचा राग भडकला, देवापेक्षा स्वतःला निर्दोष ठरविल्याबद्दल ईयोबावर त्याचा राग भडकला. 3 अलीहूचा राग आणखी त्याच्या तीनही मित्रावर भडकला कारण ईयोबासाठी त्यांना कोणतेही उत्तर सापडले नाही, आणि तरीही ते ईयोबाला दोष देत राहीले होते. 4 दुसरे लोक त्याच्यापेक्षा वयाने मोठे असल्या कारणाने अलीहूने ईयोबास बोलण्यास वाट पाहिली. 5 तथापि, जेव्हा अलीहूने बघीतले कि, त्या तीन पुरूषांकडे काहीही उत्तर नाही हे पाहून, त्याचा राग भडकला. 6 मग बरखेल बूजी याचा पुत्र अलीहू याने उत्तर दिले, तो म्हणाला, मी तरूण आहे व तुम्ही वृद्ध आहात. म्हणून मी तुम्हास बोलण्याची हिम्मत केली नाही आणि माझे मत बोलून दाखवले नाही. 7 मी म्हणालो, जास्त दिवस पाहिलेल्यांनी बोलले पाहीजे, जास्त वर्ष घातलेल्यांनी ज्ञान शिकवावे. 8 परंतु देवाचा आत्मा मनुष्यात असतो, सर्वसमर्थाचा श्वास त्यास समजबुद्धी देतो. 9 मनुष्य महान असला म्हणजेच तो ज्ञानी असतो असे नाही, जे वयाने मोठे आहेत त्यांनाच न्यायाची जाण आहे असेही नाही. 10 त्या कारणामुळे मी तुम्हास म्हणतो, माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, मी देखील माझे ज्ञान तुम्हास सांगेन. 11 पाहा, मी तुमच्या शब्दांची वाट पाहीली, जेव्हा तुम्ही काय बोलावे हे विचार करीत असता, मी तुमचे वादविवाद ऐकले आहेत. 12 खरे पाहता, मी तुझ्याकडे लक्ष लावले, परंतू, पाहा, तुमच्यापैकी असा कोणीही नाही का जो ईयोबाला समजावेल किंवा त्याच्या शब्दांना प्रतीसाद देईल. 13 संभाळा, आम्हास ज्ञान सापडले असे म्हणण्यास धजू नको! देव ईयोबाला हरवील, मर्त्य मनुष्य हे करू शकत नाही. 14 ईयोबाने त्याचे शब्द माझ्या विरोधात वापरले नाहीत, म्हणून मी तुमच्या शब्दांनी त्यास उत्तर देणार नाही. 15 हे तीनही माणसे मुके झाले आहेत, आता ते ईयोबाला उत्तर देऊ शकत नाहीत. 16 ते बोलत नाहीत म्हणून मी वाट पाहावी काय? ते शांत उभे आहेत आणि काहीच उत्तर देत नाहीत. 17 नाही, मी माझ्या बाजूने उत्तर देईल, मी माझे ज्ञान त्यांना शिकवीन. 18 माझ्याजवळ पुष्कळ शब्द आहेत, माझा आत्मा मला स्फुर्ती देत आहे. 19 पाहा, माझे मन बंद करून ठेवलेल्या द्राक्षरसाप्रमाणे झाले आहे, नवीन द्राक्षरसाच्या बूधल्याप्रणाणे ते फुटण्यास आले आहे. 20 मी बोललो तर मला बरे वाटेल, मी माझे ओठ उघडेल आणि उत्तर देईल. 21 मी कोणाची बाजू घेणार नाही, किंवा कोणत्याही मनुष्यांनी खुशामत करणार नाही. 22 खुशामत कशी करावी ते मला माहीती नाही, जर मी तसे केले असेल तर, माझा निर्माता मला लवकर घेवून जाईल.

Okumayı gerçek bir çalışmaya dönüştür

Ayet kaydetmek, not almak ve YZ destekli araçlarla çalışmak için kayıt ol.

Bu bölümden sonraki adımınızı seçin Okumaya devam et, bir plan seç veya AI ile çalışmaya devam et.
Bu bölümün açtığı temaları takip et Bu bölümün açmış olabileceği daha büyük sorular için ilgili konu merkezleri.