Hosea 9

Bu bölümü AI ile başlat

Bu bölüm hakkında AI'ye sor

Metinde kal ve hareket, gerilim, arka plan ve bu bölümün daha büyük kitap içinde ne açığa çıkardığı hakkında sor.

1 हे इस्राएला, इतर लोकांसारखा आनंद करु नको, कारण तू आपल्या देवाला सोडून अविश्वासू झाला आहेस, तुला प्रत्येक खळ्यावर व्यभिचाराचे वेतन आवडते. 2 पण खळे आणि द्राक्षांचे कुंड त्यांना खाऊ घालणार नाही, नवा द्राक्षरस त्यांना निराश करेल. 3 ते परमेश्वराच्या देशात राहणार नाहीत, त्याशिवाय एफ्राईम मिसरात परत जाईल, आणि एके दिवशी ते अश्शूरात अमंगळ पदार्थ खातील. 4 ते परमेश्वरास द्राक्षरसाचे पेयार्पणे देणार नाही, व ते त्यास प्रसन्न करु शकणार नाहीत, त्यांचे बलीदान त्यांच्यासाठी शोकाची भाकर होईल जे ते खातील ते अशुद्ध होतील, कारण त्यांचे भोजन त्यांच्यापुरतेच असेल, ते परमेश्वराच्या मंदीरात आणता येणार नाही. 5 परमेश्वराच्या सणाच्या दिवशी नेमलेल्या उत्सवाच्या दिवशी तुम्ही देवासाठी काय कराल? 6 कारण पहा, जर ते नाशापासून वाचले तर, मिसर त्यांना एकत्र करील आणि मोफ त्यांना मुठमाती देईल, वन्य झाडे त्यांचे सोने, रुपे मिळवतील आणि त्यांचे डेरे काट्यांनी भरून जातील. 7 शासन करण्याचे दिवस येत आहेत, प्रतिफळाचे दिवस येत आहेत, इस्राएल हे जाणणार, तुझ्या महापातकामुळे, वैरभावामुळे आता संदेष्टा मूर्ख बनला आहे. 8 संदेष्टा जो माझ्या देवासोबत आहे, तो एफ्राईमाचा रखवालदार आहे, पण तो आपल्या सर्व मार्गात पारध्याचा पाश आहे आणि त्यामध्ये देवाच्या घराविषयी वैरभाव भरलेला आहे. 9 गिबात घडलेल्या गोष्टींच्या वेळी झाले त्यासारखा त्यांनी अती भ्रष्टाचार केला आहे. देव त्यांच्या अधर्माची आठवण करून त्यांना त्यांच्या पापासाठी शासन करणार आहे. 10 परमेश्वर म्हणतो, मला इस्राएल जेव्हा आढळला तेव्हा तो रानात द्राक्ष मिळाल्यासारखा होता, अंजीराच्या हंगामातल्या प्रथम फळासारखे तुमचे पुर्वज मला आढळले पण ते बआल-पौराकडे आले आणि लज्जास्पद मूर्तीस त्यांनी आपणास वाहून घेतले ते त्यांच्या मूर्तीसारखे घृणास्पद झाले. 11 एफ्राईमाचे गौरव पक्षाप्रमाणे उडून जाईल तिथे जन्म, गरोदरपणा आणि गर्भधारणा होणार नाही. 12 जरी त्यांच्या मुलांचे पालन पोषण होऊन ती मोठी झाली तरी मी ते हिरावून घेणार यासाठी की त्यामध्ये कोणी राहू नये. मी त्यांच्यापासून वळून जाईल तेव्हा त्यांच्यावर हाय हाय! 13 मी एफ्राईमास पाहिले तेव्हा तो मला सोरासारखा, कुरणात लावलेल्या रोपटयासारखा दिसला पण तरी तो आपल्या मुलास बली देणाऱ्या मनुष्यासारखा होऊन जाईल. 14 त्यास दे, परमेश्वरा, त्यास काय देशील? त्यांना गर्भपात करणारे गर्भाशय व सुकलेले स्तन त्यांना दे. 15 कारण त्यांची सर्व अधमता गिल्गालात आहे, तेथेच मला त्यांच्याविषयी द्वेष निर्माण झाला. त्यांच्या पापकृत्यामुळे मी माझ्या घरातून त्यांना हाकलणार त्यांच्यावर प्रेम करणार नाही कारण त्यांचे सर्व अधिकारी बंडखोर आहेत. 16 एफ्राईम रोगी आहे त्यांचे मूळ सुकून गेले आहे, त्यास फळ येणार नाही, त्यांना जरी मुले झाली तरी मी त्यांची प्रिय मुले मारून टाकीन. 17 माझा देव त्यांना नाकारेल कारण त्यांनी त्याचे ऐकले नाही, ते देशोदेशी भटकणारे होतील.

Okumayı gerçek bir çalışmaya dönüştür

Ayet kaydetmek, not almak ve YZ destekli araçlarla çalışmak için kayıt ol.

Bu bölümden sonraki adımınızı seçin Okumaya devam et, bir plan seç veya AI ile çalışmaya devam et.
Bu bölümün açtığı temaları takip et Bu bölümün açmış olabileceği daha büyük sorular için ilgili konu merkezleri.