2 Samuel 9

Bu bölümü AI ile başlat

Bu bölüm hakkında AI'ye sor

Metinde kal ve hareket, gerilim, arka plan ve bu bölümün daha büyük kitap içinde ne açığa çıkardığı hakkında sor.

1 दावीदाने विचारले, “शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिली आहे का?” योनाथानासाठी मला तिच्यावर दया दाखवली पाहिजे. 2 सीबा नावाचा एक चाकर शौलाच्या घराण्यातला होता. दावीदाच्या सेवकांनी त्यास दावीदासमोर पाचारण केले. दावीदाने त्यास विचारले, “तूच सीबा काय? सीबा म्हणाला,” “होय, मीच तुमचा दास सीबा.” 3 तेव्हा राजा म्हणाला, शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाच्या कृपेचा लाभ त्यास मिळाला पाहिजे. सीबा राजाला म्हणाला, योनाथानाचा मुलगा आहे. तो दोन्ही पायांनी पांगळा झाला आहे. 4 तेव्हा दावीदाने सीबाला त्याचा ठावठिकाणा विचारला. सीबाने सांगितले, तो लो-दबार येथे अम्मीएलचा मुलगा माखीर याच्या घरी आहे. 5 तेव्हा राजा दावीदने मनुष्य पाठवून त्यास लो-दबाराहून अम्मीएलचा मुलगा माखीर ह्याच्या घरून बोलावून आणले. 6 शौलाचा पुत्र योनाथान, याचा पुत्र मफीबोशेथ आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. मफीबोशेथ? राजाने विचारले, मफीबोशेथ म्हणाला, होय, मीच तुमचा सेवक मफीबोशेथ. 7 त्यास दावीद म्हणाला, भिऊ नको; तुझे वडील योनाथान यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. तुझ्या वडीलासाठी मी एवढे करीन, तुझे आजोबा शौल यांची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करावे. 8 मफीबोशेथने पुन्हा दंडवत घातले. तो म्हणाला, आपण अशा माझ्यासारख्या मरण पावलेल्या कुत्र्यावर कृपादृष्टी करावी असा आपला दास कोण आहे? 9 दावीदाने मग शौलाचा सेवक सीबा याला बोलवले. त्यास तो म्हणाला, शौलाच्या मालकीचे जे जे काही आहे, ते मी या तुझ्या मालकांच्या नातवाला, मफीबोशेथला दिले आहे. 10 त्याची जमीन तू कसायची. तुझी मुले आणि सेवक यांनी एवढे केले पाहिजे, तुम्ही शेतात पीक काढा, म्हणजे तुझ्या मालकाचा नातू मफीबोशेथ याचा त्यावर निर्वाह होईल. पण तो नेहमी माझ्या पंक्तीला जेवेल. सीबाला पंधरा पुत्र आणि वीस नोकर होते. 11 सीबा दावीदाला म्हणाला, मी तुमचा दास आहे. माझ्या धन्याच्या राजाच्या हुकुमाप्रमाणेच मी वागेन. तेव्हा मफीबोशेथ दावीदाच्या मुलांप्रमाणेच दावीदाच्या पंक्तीला बसून जेवू लागला. 12 मफीबोशेथला मीखा नावाचा लहान मुलगा होता. सीबाच्या परिवारातील सर्व लोक मफीबोशेथचे चाकर झाले. 13 मफीबोशेथ दोन्ही पायांनी पांगळा होता. यरूशलेम येथे त्याचे वास्तव्य होते. तो नित्य राजाच्या पक्तींस भोजन करीत असे.

Okumayı gerçek bir çalışmaya dönüştür

Ayet kaydetmek, not almak ve YZ destekli araçlarla çalışmak için kayıt ol.

Bu bölümden sonraki adımınızı seçin Okumaya devam et, bir plan seç veya AI ile çalışmaya devam et.
Bu bölümün açtığı temaları takip et Bu bölümün açmış olabileceği daha büyük sorular için ilgili konu merkezleri.