2 Peter 1

Bu bölümü AI ile başlat

Bu bölüm hakkında AI'ye sor

Metinde kal ve hareket, gerilim, arka plan ve bu bölümün daha büyük kitap içinde ne açığa çıkardığı hakkında sor.

1 आपला देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या नीतिमत्त्वाने आमच्यासारखा, मोलवान विश्वास मिळालेल्या लोकांस, येशू ख्रिस्ताचा दास व प्रेषित शिमोन पेत्र ह्याजकडून पत्र; 2 देव आणि आपला प्रभू येशू ह्यांच्या ओळखीने तुम्हास कृपा व शांती विपुल मिळत राहो. 3 देवाने तुम्हा आम्हास आपल्या गौरवासाठी व सात्विकतेसाठी बोलावले आहे, त्याच्या ओळखीच्या द्वारे, त्याच्या दैवी सामर्थ्याने जीवनास व सुभक्तीस आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी दिल्या आहेत. 4 त्यांच्यायोगे मोलवान व अति महान वचने देण्यात आली आहेत; ह्यासाठी की, त्यांच्याद्वारे तुम्ही वासनेपासून उत्पन्न होणारी जगातील भ्रष्टता चुकवून दैवी स्वभावाचे भागीदार व्हावे. 5 ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची 6 ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती, 7 आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा. 8 कारण हे गुण तुम्हामध्ये असून ते वाढते असले तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या ओळखीविषयी तुम्ही निरुपयोगी व निष्फळ ठरणार नाही, असे ते तुम्हास करतील. 9 ज्याच्या ठायी या गोष्टी नाहीत तो आंधळा आहे; अदूरदृष्टीचा आहे, त्यास आपल्या पूर्वीच्या पापांपासून शुद्ध झाल्याचा विसर पडला आहे; 10 म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही. 11 आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल. 12 या कारणास्तव, जरी तुम्हास या गोष्टी माहित आहेत आणि प्राप्त झालेल्या सत्यात तुम्ही स्थिर झाला आहा, तरी तुम्हास त्यांची नेहमीच आठवण देण्याची काळजी घेईन. 13 मी या मंडपात आहे तोपर्यंत तुम्हास आठवण देऊन जागृत ठेवणे हे मला योग्य वाटते. 14 कारण मला माहीत आहे की, आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याने मला कळवल्याप्रमाणे मला माझा मंडप लवकर काढावा लागेल. 15 आणि माझे निघून जाणे झाल्यानंतरही या गोष्टी, सतत तुमच्या स्मरणात रहाव्या म्हणून शक्य तितके करीन. 16 कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे ऐश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो. 17 कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.” 18 त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. 19 शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्‍या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल. 20 तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. 21 कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.

Okumayı gerçek bir çalışmaya dönüştür

Ayet kaydetmek, not almak ve YZ destekli araçlarla çalışmak için kayıt ol.

Bu bölümden sonraki adımınızı seçin Okumaya devam et, bir plan seç veya AI ile çalışmaya devam et.
Bu bölümün açtığı temaları takip et Bu bölümün açmış olabileceği daha büyük sorular için ilgili konu merkezleri.