Philippians 4

Simulan ang kabanatang ito gamit ang AI

Magtanong sa AI tungkol sa kabanatang ito

Manatili sa teksto at magtanong tungkol sa kilusan, tensyon, background, at kung ano ang inihahayag ng kabanatang ito sa loob ng mas malaking aklat.

1 म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा. 2 मी युवदीयेला विनंती करतो आणि सुंतुखेला विनंती करतो की, तुम्ही प्रभूच्या ठायी एकमनाचे व्हा. 3 आणि हे माझ्या खऱ्या सोबत्या पण मी तुलाही विनवितो की, तू या स्त्रियांनी माझ्याबरोबर आणि क्लेमेंत व ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत असे माझे सहकारी ह्यांच्याबरोबर शुभवर्तमानाच्या कामी श्रम केले त्यांना साहाय्य कर. 4 प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा. 5 सर्व लोकांस तुमची सहनशीलता कळून येवो; प्रभू समीप आहे. 6 कशा ही विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; 7 म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील. 8 बंधूंनो, शेवटी इतके सांगतो की, जे काही खरे आहे, जे काही आदरणीय आहे, जे काही न्याय्य आहे, जे काही शुद्ध आहे, जे काही प्रशंसनीय, जे काही श्रवणीय, जो काही सद्गुण, जी काही स्तुती, त्यावर विचार करा. 9 माझ्यापासून जे तुम्ही शिकला, जे स्वीकारले व माझे जे ऐकले व पाहिले ते तुम्ही आचरीत राहा आणि शांतीदाता देव तुमच्याबरोबर राहील. 10 मला प्रभूमध्ये फार आनंद झाला. आता तुमची माझ्याविषयीची काळजी पुन्हा जागृत झाली. ही काळजी तुम्ही करीतच होता, पण तुम्हास संधी नव्हती. 11 मला काही कमी पडल्यामुळे मी बोलत आहे असे नाही, कारण मी असेन त्या स्थितीत संतुष्ट राहण्यास शिकलो आहे. 12 दीन अवस्थेत कसे रहावे हे मी जाणतो आणि विपुलतेत कसे रहावे हेही मी जाणतो; कसेही व कोणत्याही परिस्थितीत, तृप्त होण्यास तसेच उपाशी राहण्यास, विपुलतेत राहण्यास तसेच गरजेत राहण्यास मला शिक्षण मिळाले आहे. 13 आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तीमान आहे. 14 पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत. 15 फिलिप्पैकरांनो, तुम्ही जाणता की, शुभवर्तमानाच्या प्रारंभी जेव्हा मी मासेदोनियामधून निघालो, तेव्हा तुमच्याशिवाय कोणतीच मंडळी माझ्याबरोबर देण्याघेण्याच्या बाबतीत माझी भागीदार झाली नाही. 16 मी थेस्सलनीकात होतो तेव्हा तुम्ही एकदाच नाही दुसर्‍यांदाही माझी गरज भागविली. 17 मी देणगीची अपेक्षा करतो असे नाही पण तुमच्या हिशोबी जमेची बाजू वाढावी अशी इच्छा करतो. 18 पण माझ्याजवळ सर्वकाही आहे आणि विपुल आहे आणि एपफ्रदीताच्या हाती तुम्ही जे पाठवले ते मिळाल्याने मला भरपूर झाले आहे. ते जणू काय सुगंध, असे देवाला मान्य व संतोषकारक अर्पण असे आहे. 19 माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील. 20 आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन. 21 ख्रिस्त येशूतील सर्व पवित्र जनांस सलाम सांगा. माझ्याबरोबरचे बंधू तुम्हास सलाम सांगतात. 22 सर्व पवित्रजन आणि विशेषतः कैसराच्या घरचे तुम्हास सलाम सांगतात. 23 प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुमच्या आत्म्याबरोबर असो.

Gawing tunay na pag-aaral ang pagbabasa

Mag-sign up para mag-bookmark ng mga talata, gumawa ng tala, at mag-aral gamit ang AI tools.

Piliin ang susunod mong hakbang pagkatapos ng kabanatang ito Magpatuloy sa pagbabasa, pumili ng plano, o magpatuloy sa pag-aaral gamit ang AI.
Sundin ang mga temang binubuksan ng kabanatang ito Mga kaugnay na topic hub para sa mas malalaking tanong na maaaring nabuksan ng kabanatang ito.