Exodus 38

Simulan ang kabanatang ito gamit ang AI

Magtanong sa AI tungkol sa kabanatang ito

Manatili sa teksto at magtanong tungkol sa kilusan, tensyon, background, at kung ano ang inihahayag ng kabanatang ito sa loob ng mas malaking aklat.

1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली. 2 त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, ती अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली. 3 त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली. 4 त्याने वेदीला सभोवती कंगोऱ्याच्या खाली पितळेची जाळी बनवली, ती खालपासून वेदीच्या तळाच्या अर्ध्या अंतरापर्यंत वर आली. 5 त्याने पितळेच्या जाळीच्या चारही कोपऱ्यांना दांडे घालण्यासाठी चार कड्या ओतून तयार केल्या; 6 त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते पितळेने मढवले. 7 वेदी उचलून नेण्याकरता तिच्या बाजूच्या कड्यांत त्याने दांडे घातले; वेदीच्या चारही बाजूंना फळ्या लावून ती मध्यभागी पोकळ ठेवली. 8 दर्शनमंडपाच्या दारापाशी सेवा करण्याऱ्या स्रियांनी अर्पण म्हणून आणलेल्या पितळी आरशांचे पितळ घेऊन त्याने गंगाळ व त्याची बैठक बनवली. 9 त्याने अंगण तयार केले; त्याच्या दक्षिण बाजूला कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या पडद्यांची लांबी शंभर हात होती. 10 तिला वीस खांब असून त्या खांबासाठी पितळेच्या वीस उथळ्या होत्या; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. 11 अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती व तिच्यासाठीही वीस पितळी उथळ्या असलेल्या वीस खांबावर ती आधारलेली होती; खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. 12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; या खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; 13 पूर्वेकडील बाजू पन्नास हात लांब होती; 14 अंगणाच्या फाटकाच्या एका बाजूला पंधरा हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात होती; तिच्यासाठी तीन खांब व तीन उथळ्या होत्या; 15 आणि अंगणाच्या फाटकाची दुसरी बाजूही अगदी तशीच होती. अंगणाच्या फाटकाच्या या बाजूला व त्या बाजूला पंधरा पंधरा हात पडदे जोडून केलेल्या कनाती होत्या, त्यांना तीन तीन खांब व त्यांच्या उथळ्याही तीन तीन होत्या. 16 अंगणाच्या सभोवतालचे सर्व पडदे कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे होते. 17 खांबांच्या उथळ्या पितळेच्या आणि आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती; अंगणाचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडले होते. 18 अंगणाच्या फाटकाचा पडदा निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि कातलेल्या तलम सणाच्या कापडाचा होता; त्यावर वेलबुट्टीदार विणकाम केलेले होते; तो वीस हात लांब व पाच हात उंच होता; ही उंची अंगणाच्या पडद्या इतकी पाच हात असावी. 19 तो पडदा पितळेच्या चार उथळ्या आणि चार खांबावर आधारलेला होता; खांबांवरील आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या बनवलेल्या होत्या; खांबांची वरची टोके चांदीने मढवली होती. 20 निवासमंडपाच्या आणि अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व मेखा पितळेच्या होत्या. 21 निवासमंडपाचे म्हणजे साक्षपटाच्या निवासमंडपाच्या ज्या वस्तू लेव्यांच्या सेवेकरीता केले त्याची यादी मोशेच्या सांगण्यावरून अहरोन याजकाचा पुत्र इथामार ह्याने केली ती ही; 22 ज्या ज्या वस्तू करण्याविषयी परमेश्वराने मोशेला आज्ञा दिली होती त्या सर्व वस्तू यहूदा वंशातील हुराचा नातू म्हणजे ऊरीचा पुत्र बसालेल याने बनवल्या; 23 तसेच त्यास मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढणारा होता. 24 पवित्रस्थानाच्या सर्व कामाकरता अर्पण केलेले सोने सुमारे एकोणतीस किक्कार होते आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सातशे तीस शेकेल होते. 25 मंडळीपैकी ज्यांची नोंद करण्यात आली त्या एकूण लोकांनी अर्पण केलेली चांदी शंभर किक्कार भरली आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे सतराशे पंचाहत्तर शेकेल भरली. 26 वीस वर्षे व त्याहून अधिक वयाच्या पुरुषांची गणती केली तेव्हा ते सहा लाख, तीन हजार, पाचशे पन्नास भरले आणि पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे प्रत्येका मनुष्यामागे एक बेका चांदी म्हणजे अर्धा शेकेल मिळाला. 27 त्यांनी ती शंभर किक्कार चांदी पवित्रस्थानातील उथळ्या व अंतरपटाच्या उथळ्या करण्यासाठी वापरली; त्यांनी प्रत्येक उथळीसाठी प्रत्येकी एक किक्कार अशा शंभर किक्काराच्या शंभर उथळ्या बनविल्या. 28 बाकीची सतराशे पंचाहत्तर शेकेल चांदी आकड्या, बांधपट्ट्या आणि खांबांना मढविण्यासाठी लागली. 29 सत्तर किक्कार व दोन हजार चारशे शेकेल अधिक पितळ अर्पण करण्यात आले होते. 30 त्या पितळेच्या दर्शनमंडपाच्या प्रवेश दाराजवळील उथळ्या, वेदीची उपकरणे व तिची जाळी ह्यांकरता; 31 त्याचप्रमाणे अंगणाच्या कनातीच्या खांबांच्या उथळ्या, प्रवेशद्वारावरील पडद्यांच्या खांबांच्या उथळ्या, तसेच पवित्र निवासमंडप अंगणाच्या चारही बाजूस लागणाऱ्या मेखा बनविण्यासाठी उपयोग झाला.

Gawing tunay na pag-aaral ang pagbabasa

Mag-sign up para mag-bookmark ng mga talata, gumawa ng tala, at mag-aral gamit ang AI tools.

Piliin ang susunod mong hakbang pagkatapos ng kabanatang ito Magpatuloy sa pagbabasa, pumili ng plano, o magpatuloy sa pag-aaral gamit ang AI.
Sundin ang mga temang binubuksan ng kabanatang ito Mga kaugnay na topic hub para sa mas malalaking tanong na maaaring nabuksan ng kabanatang ito.