Leviticus 11

Начать эту главу с AI

Спросить ИИ об этой главе

Оставайтесь в тексте и спрашивайте о движении, напряжении, контексте и том, что открывает эта глава внутри более широкой книги.

1 परमेश्वर मोशे व अहरोन ह्यांना म्हणाला: 2 इस्राएल लोकांस असे सांगा की पृथ्वीवरील ज्या प्राण्यांचे मांस तुम्ही खावे ते हे: 3 ज्या प्राण्यांचे खूर दुभंगलेले आहेत व जे रवंथ करतात त्यांचे मांस तुम्ही खावे. 4 काही प्राणी रवंथ करतात परंतु त्यांचे खूर दुभंगलेले नाहीत, म्हणून ते तुम्ही अशूद्ध समजावे, जसे उंट, हा रवंथ करतो पंरतू त्याचा खुर विभागलेला नाही, म्हणून तो तुम्ही अशुद्ध समजावा. 5 शाफान हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो अशुद्ध समजावा. 6 ससा हा रंवथ करतो परंतु त्याचा खुर विभागलेला नाही म्हणून तुम्ही तो सुध्दा अशुद्ध समजावा. 7 डुकराचे खूर दुभंगलेले आहे पण तो रवंथ करत नाही म्हणून तो तुम्हाकरिता अशुद्ध आहे. 8 या प्राण्यांचे मांस तुम्ही खाऊ नये व त्यांच्या शवांना शिवू नये; ते तुमच्यासाठी अशुद्ध आहेत. 9 “जलाशयात, समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख व खवले आहेत ते तुम्ही खावे. 10 जलचरापैकी समुद्रात व नद्यात संचार करणाऱ्या ज्या प्राण्यांना पंख आणि खवले नाहीत असे प्राणी तुम्ही खाऊ नये; परमेश्वराच्या दृष्टीने ते अयोग्य आहेत. 11 ते तुम्ही अयोग्य समजावे; त्यांचे मांस खाऊ नये; त्यांच्या शवांना देखील शिवू नये. 12 जलाशयातल्या ज्या प्राण्यांना पंख व खवले नाहीत ते देवाच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत ते ओंगळ समजावे.” 13 देवाच्या दृष्टीने अशुद्ध प्राण्याप्रमाणेच अशुद्ध असलेले म्हणून खाऊ नयेत ते पक्षी असे; गरुड, गीध, कुरर, 14 घार, निरनिराळ्या जातीचे ससाणे, 15 निरनिराळ्या जातीचे कावळे, 16 शहामृग, गवळण, कोकीळ, निरनिराळ्या जातीचे बहिरी ससाणे, 17 पिंगळा, करढोक, मोठे घुबड, 18 पांढरे घुबड, पाणकोळी, गिधड, 19 करकोचा, निरनिराळ्या जातीचे बगळे, टिटवी आणि वटवाघूळ. 20 जितके पंख असलेले कीटक प्राणी चार पायावर चालतात तितके परमेश्वराच्या दृष्टीने खाण्यास योग्य नाहीत; ते खाऊ नये! 21 परंतु पायावर चालणाऱ्या व पंख असलेल्या प्राण्यांपैकी ज्यांना जमिनीवर उड्या मारण्यासाठी पायाबरोबर तंगड्या असतात ते तुम्ही खावे. 22 त्याचप्रमाणे निरनिरळ्या जातीचे टोळ, निरनिरळ्या जातीचे नाकतोडे, निरनिरळ्या जातीचे खरपुडे व निरनिरळ्या जातीचे गवत्ये टोळ तुम्ही खावू शकता. 23 परंतु चार पायाचे पंख असलेले इतर प्राणी परमेश्वराच्या दृष्टीने ओंगळ आहेत ते खाऊ नये. 24 त्यांच्यामुळे तुम्ही अशुद्ध व्हाल; जो कोणी त्यांच्या शवांना स्पर्श करेल तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध होईल; 25 जो कोणी मरण पावलेल्या कीटकांना उचलील, त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 26 ज्या प्राण्याचे खूर दुभागलेले आहेत पण ते दोन अगदी सारखे भाग करीत नाहीत व जे रवंथ करीत नाहीत ते तुम्ही अशुद्ध समजावेत; 27 चार पायावर चालणाऱ्या सर्व पशूपैकी जे आपल्या पंजावर चालतात ते सर्व तुम्ही अशुद्ध समजावे; त्याचा शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 28 जो कोणी त्यांची शवे उचलील त्याने आपली वस्त्रे धुवून संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; ते प्राणी तुम्ही अशुद्ध समजावे. 29 जमिनीवर रांगणाऱ्या प्राण्यांपैकी तुम्ही अशुद्ध समजावे ते हे: मुंगूस, उंदीर, निरनिराळ्या जातीचे सरडे, 30 चोपई, घोरपड, पाल, सांडा व गुहिऱ्या सरडा. 31 हे प्राणी तुम्हाकरिता अशुद्ध समजावे. त्यांच्या शवांना जो कोणी स्पर्श करेल त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 32 त्यांच्यापैकी कोणी मरून एखाद्या वस्तूवर पडला तर ती वस्तूही अशुद्ध समजावी; लाकडी पात्र, वस्त्र कातडे, तरट किंवा कोणत्याही कामाचे हत्यार असो, ते पाण्यात टाकावे व संध्याकाळपर्यंत अशुद्ध समजावे; मग ते धुतल्यावर शुद्ध समजावे. 33 त्यांच्यापैकी एखादा मरुन मातीच्या पात्रात पडला तर त्या पात्रात जे काही असेल ते अशुद्ध समजावे व ते पात्र फोडून टाकावे. 34 अशुद्ध भांड्याचे पाणी अन्नावर पडल्यास ते अन्नही अशुद्ध समजावे व अशा भांड्यातील कोणतेही पेय असेल तर तेही अशुद्ध समजावे. 35 त्यांच्या शवांचा एखादा भाग एखाद्या भट्टीवर किंवा चुलीवर पडला तर ती अशुद्ध समजून, तिचे तुकडे तुकडे करून ती मोडून तोडून टाकावी, ती पुन्हा शुद्ध होणार नाही; म्हणून तुम्ही ती अशुद्ध समजावी. 36 झरा किंवा विहीर, ज्यांच्यात सतत पाणी असते ते शुद्धच राहतात; परंतु त्याच्यातील शवांना जो स्पर्श करेल तो अशुद्ध होईल. 37 त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग पेरण्याच्या बियाणावर पडला तरी ते बियाणे शुद्ध समजावे; 38 परंतु जर बियाणे पाण्याने भिजल्यावर त्या प्राण्याच्या शवाचा काही भाग त्यावर पडला तर ते तुम्ही अशुद्ध समजावे. 39 खाण्यास योग्य अशा प्राण्यांपैकी एखादा मेला आणि त्याच्या शवास कोणी स्पर्श केला तर त्याने संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 40 कोणी त्याच्या शवाचा काही भाग खाल्ला तर त्याने आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे; जो त्याचे शव उचलील त्यानेही आपली वस्त्रे धुवावी व संध्याकाळपर्यंत अशुद्ध रहावे. 41 “जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी अशुद्ध आहेत; परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ते खाऊ नयेत. 42 जमिनीवर जे आपल्या पोटावर सरपटतात, किंवा चार पायावर चालतात, किंवा ज्यांना फार पाय आहेत असे सरपटणारे प्राणी तुम्ही खाऊ नयेत, कारण ते ओंगळ आहेत. 43 कोणत्याही जातीच्या रांगणाऱ्या प्राण्यामुळे तुम्ही स्वत:ला अशुद्ध करून घेऊ नका, किंवा त्यांच्यामुळे स्वत:ला अशुद्ध करून विटाळवू नका! 44 कारण मी परमेश्वर, तुमचा देव आहे! मी पवित्र आहे! म्हणून तुम्हीही आपणांस पवित्र असे ठेवावे! म्हणून जमिनीवर रांगणाऱ्या कोणत्याही जातीच्या प्राण्यामुळे तुम्ही आपणास विटाळवू नका! 45 मी परमेश्वर, ज्याने तुम्हास मिसर देशातून यासाठी बाहेर आणले की तुम्ही माझे पवित्र लोक व्हावे व मी तुमचा देव असावे; मी पवित्र आहे म्हणून तुम्हीही पवित्र असावे!” 46 प्राणी, पक्षी, सर्व जलचर व जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी ह्याच्याविषयी हे नियम आहेत. 47 या नियमावरून शुद्ध प्राणी व अशुद्ध प्राणी, तसेच खाण्यास योग्य असे प्राणी व जे खाऊ नयेत असे प्राणी ह्याच्यातील भेद तुम्हास समजावा.

Превратите чтение в настоящее изучение

Зарегистрируйтесь, чтобы сохранять стихи, вести заметки и изучать с помощью ИИ.

Выберите следующий шаг после этой главы Продолжайте читать, выберите план или продолжите изучение с AI.
Следуйте темам, которые открывает эта глава Связанные тематические разделы для больших вопросов, которые могла открыть эта глава.