Job 3

Начать эту главу с AI

Спросить ИИ об этой главе

Оставайтесь в тексте и спрашивайте о движении, напряжении, контексте и том, что открывает эта глава внутри более широкой книги.

1 यानंतर, ईयोबाने आपले तोंड उघडले आणि आपल्या जन्मदिवसास शाप दिला. 2 तो (ईयोब) म्हणाला, 3 “मी ज्या दिवशी जन्मलो तो दिवस नष्ट होवो, मुलाची गर्भधारणा झाली अशी जी रात्र म्हणाली ती भस्म होवो. 4 तो दिवस अंधकारमय होवो, देवाला त्याचे विस्मरण होवो, त्यावर सुर्यप्रकाश पडला नसता तर फार बरे झाले असते. 5 मृत्यूची सावली आणि अंधार त्यास आपल्या स्वतःचा समजो, ढग सदैव त्यावर राहो, जी प्रत्येक गोष्ट दिवसाचा अंधार करते ती त्यास खरेच भयभीत करो, 6 ती रात्र काळोख घट्ट पकडून ठेवो, वर्षाच्या दिवसांमध्ये ती आनंद न पावो. महिन्याच्या तिथीत तिची गणती न होवो. 7 पाहा, ती रात्र फलीत न होवो, तिच्यातून आनंदाचा ध्वनी न येवो. 8 जे लिव्याथानाला जागविण्यात निपुण आहेत ते त्या दिवसास शाप देवो. 9 त्या दिवसाच्या पहाटेचे तारे काळे होत. तो दिवस प्रकाशाची वाट पाहो पण तो कधी न मिळो, त्याच्या पापण्यास उषःकालाचे दर्शन न घडो. 10 कारण तिने माझ्या जननीचे ऊदरद्वार बंद केले नाही, आणखी हे दुःख माझ्या डोळ्यापासून लपवीले नाही. 11 उदरातुन बाहेर आलो तेव्हाच मी का मरण पावलो नाही? माझ्या आईने मला जन्म देताच मी का प्राण त्यागला नाही? 12 तिच्या मांडयानी माझा स्विकार का केला? किंवा मी जगावे म्हणून तिच्या स्तनांनी माझा स्विकार का केला? 13 तर मी आता निश्चिंत खाली पडून राहीलो असतो, मी झोपलो असतो आणि विश्रांती पावलो असतो. 14 पृथ्वीवरील राजे आणि सल्लागार, ज्यांनी आपल्यासाठी कबरा बांधल्या त्या आता उध्वस्त झाल्या आहेत. 15 किंवा ज्या राजकुमारांनी आपली घरे सोन्या रुप्यांनी भरली त्यांच्या बरोबरच मलाही मरण आले असते तर बरे झाले असते. 16 कदाचित मी जन्मापासूनच मृत मूल का झालो नाही, किंवा प्रकाश न पाहिलेले अर्भक मी असतो तर बरे झाले असते. 17 तेथे गेल्यानंतरच दुष्ट त्रास देण्याचे थांबवितात. तेथे दमलेल्यांना आराम मिळतो. 18 तेथे कैदीही सहज एकत्र राहतात, तेथे त्यांना गुलाम बनविणाऱ्यांचे ओरडणे ऐकू येत नाही. 19 लहान आणि थोर तेथे आहेत, तेथे गुलाम त्यांच्या मालकापासून मुक्त आहेत. 20 दुर्दशेतील लोकांस प्रकाश का दिल्या जातो, जे मनाचे कटू आहेत अशांना जीवन का दिले जाते, 21 ज्याला मरण पाहीजे त्यास मरण येत नाही, दु:खी मनुष्य गुप्त खजिन्यापेक्षा मृत्यूच्या अधिक शोधात असतो? 22 त्यास थडगे प्राप्त झाले म्हणजे ते हर्षीत होतात, त्यास अति आनंद होतो? 23 ज्या पुरूषाचा मार्ग लपलेला आहे, देवाने ज्या पुरुषाला कुपंणात ठेवले आहे अशाला प्रकाश का मिळतो? 24 मला जेवणाऐवजी उसासे मिळत आहेत! माझे कण्हने, पाण्यासारखे बाहेर ओतले जात आहे. 25 ज्या गोष्टींना मी घाबरतो त्याच गोष्टी माझ्यावर येतात. मी ज्याला भ्यालो तेच माझ्यावर आले. 26 मी निश्चिंत नाही, मी स्वस्थ नाही, आणि मला विसावा नाही. तरी आणखी पीडा येत आहे.”

Превратите чтение в настоящее изучение

Зарегистрируйтесь, чтобы сохранять стихи, вести заметки и изучать с помощью ИИ.

Выберите следующий шаг после этой главы Продолжайте читать, выберите план или продолжите изучение с AI.
Следуйте темам, которые открывает эта глава Связанные тематические разделы для больших вопросов, которые могла открыть эта глава.