Genesis 48

Начать эту главу с AI

Спросить ИИ об этой главе

Оставайтесь в тексте и спрашивайте о движении, напряжении, контексте и том, что открывает эта глава внутри более широкой книги.

1 या गोष्टीनंतर “त्याचा बाप आजारी असल्याचे” कोणी योसेफाला कळवले, म्हणून आपले दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम यांना बरोबर घेऊन तो गेला. 2 “योसेफ आपणास भेटावयास आला आहे” असे याकोबास कोणी सांगितले, हे कळवल्याबरोबर इस्राएलाने शक्ती एकवटली आणि बिछान्यावर उठून बसला. 3 मग याकोब योसेफास म्हणाला, “सर्वसमर्थ देवाने मला कनानातील लूज येथे दर्शन देऊन आशीर्वाद दिला. 4 देव म्हणाला, ‘मी तुला खूप संतती देईन व ती वाढवीन आणि मी तुला राष्ट्रांचा समुदाय करीन. आणि तुझ्यानंतर तुझ्या संतानाला हा देश कायमचा वतन म्हणून देईल.’ 5 आणि आता, मी येथे मिसर देशास येण्यापूर्वी, मिसराच्या भूमीमध्ये जे तुझ्या पोटी जन्मलेले हे दोन पुत्र, माझे आहेत. तुझे हे दोन पुत्र मनश्शे व एफ्राईम हे आता रऊबेन व शिमोन यांच्याप्रमाणेच माझे होतील. 6 त्यांच्यानंतर तुला जी संतती होईल ती तुझी होईल; त्यांच्या वतनात त्यांची नावे त्यांच्या भावांच्या नावांखाली नोंदवण्यात येतील. 7 परंतु पदन येथून मी येताना तुझी आई राहेल, एफ्राथापासून आम्ही थोड्याच अंतरावर असताना कनान देशात मरण पावली, त्यामुळे मी फार दुःखी झालो. तेव्हा एफ्राथच्या म्हणजे बेथलेहेमाच्या वाटेवर मी तिला पुरले.” 8 मग इस्राएलाने योसेफाच्या मुलांना पाहिले, तेव्हा इस्राएल म्हणाला, “हे कोणाचे आहेत?” 9 योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “हे माझे पुत्र आहेत. हे मला देवाने येथे दिले आहेत.” इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.” 10 इस्राएल अतिशय म्हातारा झाला होता आणि त्याची नजर मंद झाल्यामुळे त्यास चांगले स्पष्ट दिसत नव्हते. तेव्हा इस्राएलाने त्या मुलांना कवटाळून त्यांचे मुके घेतले. 11 मग इस्राएल योसेफास म्हणाला, “मुला तुझे तोंड पुन्हा पाहावयास मिळेल असे वाटले नव्हते, पण देवाने तुझी व माझी भेट होऊ दिली. मला तुझी मुलेही पाहू दिली.” 12 मग योसेफाने आपल्या मुलांना इस्राएलाच्या मांडीवरून काढून घेतले. ते पुत्र इस्राएलासमोर उभे राहिले व त्यांनी त्यास लवून नमन केले. 13 योसेफाने मनश्शेला आपल्या डाव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या उजव्या हाती येईल असे व एफ्राईमाला आपल्या उजव्या हाती म्हणजे तो इस्राएलाच्या डाव्या हाती येईल असे उभे केले. 14 परंतु इस्राएलाने आपला उजवा हात पुढे केला आणि एफ्राइमाच्या, म्हणजे जो धाकटा मुलगा होता त्याच्या डोक्यावर ठेवला आणि त्याचा डावा हात थोरल्याच्या म्हणजे मनश्शेच्या डोक्यावर ठेवला. त्याने त्याच्या हातांची अदलाबदल करून ते उजवेडावे केले. 15 इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद देऊन म्हटले, “ज्या देवासमोर माझे वडील, अब्राहाम व इसहाक चालले, ज्या देवाने माझ्या सर्व आयुष्यभर मला चालवले आहे, 16 तोच मला सर्व संकटातून सोडवणारा माझा देवदूत होता, तोच या मुलांना आशीर्वाद देवो. आता या मुलांना माझे नाव व वडील अब्राहाम व इसहाक यांचे नाव देण्यात येवो. ते वाढून त्यांची पृथ्वीवर अनेक कुटुंबे, कुळे व राष्ट्रे होवोत.” 17 आपल्या वडिलाने एफ्राईमाच्या डोक्यावर आपला उजवा हात ठेवला असे योसेफाने पाहिले तेव्हा त्यास ते आवडले नाही. तो हात एफ्राईमाच्या डोक्यावरून काढून मनश्शेच्या डोक्यावर ठेवावा म्हणून योसेफाने आपल्या बापाचा हात घेतला. 18 योसेफ आपल्या पित्यास म्हणाला, “असे नाही बाबा, कारण हा प्रथम जन्मलेला आहे. तुमचा उजवा हात याच्या डोक्यावर ठेवा.” 19 परंतु त्याचा वडिलाने नकार दिला आणि म्हटले, “माझ्या मुला, मला माहीत आहे. होय, मला माहीत आहे की, तोसुद्धा महान होईल. परंतु धाकटा भाऊ त्याच्यापेक्षाही अधिक महान होईल आणि त्याची कुळे वाढून त्यांचा मोठा राष्ट्रसमूह निर्माण होईल.” 20 त्या दिवशी इस्राएलाने त्या मुलांना या शब्दांत आशीर्वाद दिला, तो म्हणाला, “इस्राएल लोक आशीर्वाद देताना तुमची नावे उच्चारितील, ते म्हणतील, ‘देव तुम्हास एफ्राईमासारखा, मनश्शेसारखा आशीर्वाद देवो.’” 21 मग इस्राएल योसेफाला म्हणाला, “पाहा, मी आता मरणार आहे. परंतु देव तुमच्या बरोबर राहील, तो तुम्हास तुमच्या पूर्वजांच्या देशात घेऊन येईल. 22 तुझ्या भावांपेक्षा तुला एक भाग अधिक देतो, मी स्वतः तलवारीने व धनुष्याने लढून अमोरी लोकाकडून जिंकलेला डोंगरउतार तुला देतो.”

Превратите чтение в настоящее изучение

Зарегистрируйтесь, чтобы сохранять стихи, вести заметки и изучать с помощью ИИ.

Выберите следующий шаг после этой главы Продолжайте читать, выберите план или продолжите изучение с AI.
Следуйте темам, которые открывает эта глава Связанные тематические разделы для больших вопросов, которые могла открыть эта глава.