Exodus 9

Начать эту главу с AI

Спросить ИИ об этой главе

Оставайтесь в тексте и спрашивайте о движении, напряжении, контексте и том, что открывает эта глава внутри более широкой книги.

1 नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलण्यास सांगितले, “इब्र्यांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे.’ 2 जर तू त्यांना जाण्यापासून सतत असाच नाकारीत राहशील व जर तू त्यांना मागे ठेवून घेशील. 3 तर पाहा, घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरांचे कळप, ही जी तुझी जनावरे रानांत आहेत त्यांच्यावर परमेश्वराचा हात पडेल. भयंकर मरी उद्भवेल. 4 परंतु परमेश्वर इस्राएलाची व मिसराची गुरेढोरे यांच्यात भेद करील; इस्राएली लोकांचे एकही जनावर मरणार नाही.” 5 याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. “या देशात उद्या हे सर्व घडून येईल.” 6 दुसऱ्या दिवशी परमेश्वराने ही गोष्ट केली आणि मिसरमधील सर्व गुरे मरण पावली. परंतु इस्राएल लोकांच्या गुरांपैकी एकही मरण पावले नाही. 7 फारोने बारकाईने चौकशी केली आणि पाहा, इस्राएल लोकांच्या जनावरांपैकी एकही मरण पावले नव्हते. तरीपण फारोचे मन कठीणच राहिले. त्याने इस्राएल लोकांस जाऊ दिले नाही. 8 नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारोदेखत आकाशाकडे उधळावी. 9 त्या राखेचे बारीक कण सगळ्या मिसरभर पसरतील आणि त्यांच्या स्पर्शाने मनुष्यांना व पशूंना फोड येऊन गळवे येतील.” 10 तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे मनुष्यांना व पशूंना फोड व गळवे आले. 11 गळव्यामुळे जादूगारांना मोशेपुढे उभे राहवेना. कारण जादूगारांना व सर्व मिसरी लोक यांना गळवे आली होती. 12 परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांस जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेला असे सांगितलेच होते. 13 मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू पहाटेस उठून फारोपुढे उभा राहा; आणि त्यास सांग की इब्र्यांचा देव परमेश्वर असे म्हणतो, माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांस जाऊ दे. 14 कारण या वेळेस मी आपल्या सर्व पीडा तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर व तुझ्या लोकांवर पाठवीन म्हणजे सर्व पृथ्वीवर माझ्यासारखा कोणी देव नाही, हे यावरुन तुला कळेल. 15 मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या लोकांवर मरीचा प्रहार केला असता तू पृथ्वीवरून नष्ट झाला असता. 16 परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर विख्यात व्हावे यासाठीच मी तुला राखले आहे. 17 तू अजूनही माझ्या लोकांविरुद्ध आहेस. तू त्यांना जाऊ देत नाहीस. 18 म्हणून उद्या याच वेळेस मी गारांचा असा काही वाईट वादळी वर्षाव मिसरावर आणीन की असा गारांचा वादळी वर्षाव मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून कधी आला नाही. 19 तर आता माणसे पाठवून रानांतून तुझी गुरेढोरे व दुसरे जे काही रानात असेल ते आण. कारण जर एखादा मनुष्य किंवा पशू शेतात राहील तर तो मारला जाईल. जे जे तुम्ही तुमच्या घरात गोळा करून ठेवणार नाही त्यावर गारांचा भडीमार पडेल.” 20 फारोच्या सेवकांपैकी काहींना परमेश्वराच्या संदेशाची भीती वाटली त्यांनी लगेच आपली गुरेढोरे व गुलाम यांना आसऱ्याला घरी आणले व सुरक्षित जागी ठेवले. 21 परंतु इतर सेवकांनी परमेश्वराच्या संदेशाकडे दुर्लक्ष केले व रानांतील त्यांचे सर्व दास व गुरेढोरे, रानात राहू दिली. 22 परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरुवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुरांवर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.” 23 तेव्हा मोशेने आपली काठी आकाशाकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला. 24 गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरावर कधी आले नव्हते. 25 त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसर देशात, मनुष्ये, गुरेढोरे वगैरे जे काही वनांत होते त्या सर्वांवर गारांचा मारा झाला. शेतांतील सर्व वनस्पतींवर मारा झाला. तसेच वनांतील सर्व मोठमोठी झाडे मोडून पडली. 26 गोशेन प्रांतात इस्राएल लोक राहत होते तेथे गारांचा मुळीच वर्षाव झाला नाही. 27 फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “या वेळी मी पाप केले आहे. परमेश्वर न्यायी आहे; मी व माझे लोक, आम्ही अपराधी आहोत. 28 तुम्ही परमेश्वराकडे विनवणी करा. हा झालेला गारांचा मारा व मेघांचा गडगडाट फार भयंकर झाला तेवढे पुरे, मी तुम्हास जाऊ देतो. तुम्ही यापुढे राहणार नाही.” 29 मोशेने फारोला सांगितले, “जेव्हा मी हे शहर सोडून जाईन तेव्हा माझे हात पसरून मी परमेश्वरापुढे विनंती करीन आणि मग ही मेघगर्जना व हा गारांचा मारा थांबेल; तेव्हा तुला कळेल की पृथ्वी परमेश्वराची आहे. 30 परंतु तू व तुझे सेवक अजूनही परमेश्वर देवाचे भय बाळगीत नाहीत हे मला माहीत आहे.” 31 या वेळी सातूचे दाणे तयार होऊन तो कापणीला आला होता व जवसास बोंडे आली होती. या पिकांचा आता नाश झाला. 32 परंतु साधा गहू व काठ्या गहू इतर धान्यापेक्षा उशिरा पिकतात; त्याची उशिरा पेरणी झाल्यामुळे ते अजून उगवले नव्हते, म्हणून त्यांचा नाश झाला नाही. 33 मोशे फारोपुढून निघून नगराबाहेर गेला. त्याने परमेश्वराकडे हात पसरून प्रार्थना केली, आणि मेघगर्जना व गारांचा वर्षाव थांबला आणि पृथ्वीवर पाऊस पडणे बंद झाले. 34 पाऊस, गारा व मेघांचा गडगडाट बंद झाल्याचे फारोने पाहिले तेव्हा फारो व त्याचे सेवक यांनी मन कठोर करून पुन्हा पाप केले. 35 फारोने आपण दिलेल्या वचनाप्रमाणे करण्याचे नाकारले व इस्राएल लोकांस मोकळे करून त्याने जाऊ दिले नाही. परमेश्वराने मोशेद्वारे सांगितल्याप्रमाणेच हे झाले.

Превратите чтение в настоящее изучение

Зарегистрируйтесь, чтобы сохранять стихи, вести заметки и изучать с помощью ИИ.

Выберите следующий шаг после этой главы Продолжайте читать, выберите план или продолжите изучение с AI.
Следуйте темам, которые открывает эта глава Связанные тематические разделы для больших вопросов, которые могла открыть эта глава.