1 Samuel 20

Начать эту главу с AI

Спросить ИИ об этой главе

Оставайтесь в тексте и спрашивайте о движении, напряжении, контексте и том, что открывает эта глава внутри более широкой книги.

1 दावीद रामा येथल्या नायोथाहून पळून योनाथानाकडे येऊन म्हणाला, “मी काय केले आहे? माझा अपराध काय? तुझ्या वडिलाच्यापुढे माझे काय पाप झाले आहे की तो माझा जीव घ्यायला पाहत आहे?” 2 तेव्हा त्याने त्यास म्हटले, “असे न होवो तू मरणार नाहीस; पाहा माझा बाप लहान मोठे काहीएक कार्य मला सांगितल्या वाचून करीत नाही. तर ही गोष्ट माझा बाप माझ्यापासून कशाला गुप्त ठेवील? असे होणार नाही.” 3 मग दावीद शपथ वाहून म्हणाला, “तुझी कृपादृष्टी माझ्यावर आहे हे तुझा बाप खचित जाणतो; म्हणून तो म्हणतो, हे योनाथानाला कळू नये कळले तर त्यास दुःख होईल; परंतु खरोखर परमेश्वर जिवंत आहे व तुझा जीव जिवंत आहे माझा जीव मरणापासून केवळ पावलांच्या अंतरावर आहे.” 4 तेव्हा योनाथान दावीदाला म्हणाला “जे काही तुझा जीव इच्छितो ते मी तुझ्यासाठी करीन.” 5 दावीद योनाथानाला म्हणाला, “पाहा उद्या चंद्रदर्शन आहे तेव्हा मला राजाबरोबर जेवण्यास बसणे भागच आहे; परंतु मला जाऊ दे परवा संध्याकाळपर्यंत मी रानात लपून राहीन. 6 जर तुझ्या वडिलाने माझी आठवण काढलीच तर सांग की, दावीदाने आपले गाव बेथलहेम येथे जायला माझ्याकडे आग्रह करून रजा मागितली कारण तेथे त्याच्या सर्व कुटुंबाचा वार्षिक यज्ञ आहे. 7 जर तो, ठीक आहे असे म्हणेल तर तुझ्या दासास शांती प्राप्त होईल. परंतु जर त्यास राग आला, तर त्याने माझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे जाण. 8 यास्तव तू आपल्या दासावर कृपा कर. कारण तू आपल्या दासास आपल्याबरोबर परमेश्वराच्या करारात आणले आहे; तथापि माझ्या ठायी अन्याय असला तर तूच मला जिवे मार; तू आपल्या बापाजवळ मला का आणावे?” 9 तेव्हा योनाथान म्हणाला, “तुला असे न होवो माझ्या वडिलाने तुझे वाईट करण्याचा निश्चय केला आहे असे मला खचित समजले तर मी ते तुला सांगणार नाही काय?” 10 तेव्हा दावीद योनाथानाला म्हणाला, “जर कदाचित तुझ्या वडिलाने तुला कठोर उत्तर दिले तर ते मला कोण सांगेल?” 11 योनाथान दावीदाला म्हणाला, “चल आपण रानात जाऊ.” मग ते दोघे बाहेर रानात गेले. 12 योनाथान दावीदाला म्हणाला, “इस्राएलाचा देव परमेश्वर साक्षी असो. उद्या किंवा परवा या वेळेस मी आपल्या बापाचे मन पाहीन, तेव्हा पाहा जर, दावीदाविषयी त्याचे मन चांगले असेल तर मी तुझ्याकडे निरोप पाठवून ते तुला कळवणार नाही काय? 13 जर तुझे वाईट करावे असे माझ्या बापाला वाटले आणि जर मी ते तुला कळवले नाही, आणि तू शांतीने जावे म्हणून मी तुला रवाना केले नाही, तर परमेश्वर देव योनाथानाचे तसे व त्यापेक्षा अधिक करो. परमेश्वर जसा माझ्या बापा बरोबर होता तसा तो तुझ्या बरोबर असो.” 14 मी जिवंत आहे तोपर्यंत माझा घात होऊ नये म्हणून तू परमेश्वराची प्रेमदया माझ्यावर करावी असे केवळ नाही, 15 तर तू आपली कृपा माझ्या घराण्यावरून कधीही काढू नको; परमेश्वर दावीदाचा प्रत्येक शत्रू भूमीच्या पाठीवरून छेदून टाकील तेव्हाही ती काढू नको; 16 म्हणून योनाथानाने दावीदाच्या घराण्याशी करार करून म्हटले, “परमेश्वर दावीदाच्या शत्रूंच्या हातून याची झडती घेवो.” 17 मग योनाथानाने दावीदाकडून त्याच्यावरच्या आपल्या प्रीती करता आणखी शपथ वाहवली कारण जशी आपल्या स्वत:च्या जिवावर तशी त्याने त्याच्यावर प्रीती केली. 18 योनाथान त्यास म्हणाला, “उद्या चंद्रदर्शन आहे आणि तू नाहीस म्हणून कळेल कारण तुझे आसन रिकामे राहील. 19 तू तीन दिवस तू दूर राहील्या नंतर, ते कार्य घडले त्या दिवशी ज्या ठिकाणी तू लपला होतास तेथे लवकर ऊतरून, एजेल दगडाजवळ तू राहा. 20 मी निशाणावर नेम धरत आहे असे दाखवून तीन बाण त्याच्या बाजूला मारीन. 21 मग पाहा मी पोराला पाठवून म्हणेन जा बाणांचा शोध कर. जर मी पोराला म्हणालो, पाहा बाण तुझ्या अलीकडे आहेत ते घेऊन ये, तर तू ये; कारण तुझे कुशल आहे आणि तुझे वाईट होणार नाही; परमेश्वर जिवंत आहे. 22 परंतु जर मी पोराला म्हणेन, पाहा बाण तुझ्या पलीकडे आहेत; तर तू निघून जा कारण परमेश्वराने तुला पाठवून दिले आहे. 23 आणि जी गोष्ट तू व मी बोलतो आहे तिच्याविषयी तर पाहा परमेश्वर तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये निरंतर साक्षी आहे.” 24 मग दावीद रानात लपून राहिला आणि चंद्रदर्शन आली तेव्हा राजा जेवायला बसला. 25 राजा आपल्या आसनावर जसा इतर वेळी तसा भिंतीजवळ आसनावर बसला व योनाथान उठून उभा राहिला व अबनेर शौलाच्या बाजूला बसला परंतु दावीदाची जागा रिकामी होती. 26 तरी शौल त्या दिवशी काही बोलला नाही. कारण त्यास असे वाटले, त्यास काही झाले असेल, खचित तो शुद्ध नसेल. 27 मग चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी असे झाले की, दावीदाची जागा रिकामी होती आणि शौलाने आपला मुलगा योनाथानाला म्हटले, “इशायाचा मुलगा काल व आजही जेवायला का आला नाही.” 28 तेव्हा योनाथानाने शौलाला उत्तर दिले की, “दावीदाने बेथलहेमास जायला आग्रहाने माझ्याकडे रजा मागितली. 29 तो म्हणाला, मी तुला विनंती करतो मला जाऊ दे कारण आमचे घराणे नगरात यज्ञ करणार आहे आणि मला माझ्या भावाने आज्ञा केली आहे म्हणून आता तुझी कृपादृष्टी माझ्यावर झाली तर मला माझ्या भावांना भेटायला जाऊ दे. यामुळे तो राजाच्या पंक्तीस आला नाही.” 30 तेव्हा योनाथानावर शौलाचा राग पेटला तो त्यास म्हणाला, “अरे विपरीत फितूर खोर पत्नीच्या मुला तुझी फजिती व तुझ्या आईच्या नागवेपणाची फजिती होण्यास तू इशायाच्या मुलाशी जडलास हे मला ठाऊक नाही काय? 31 कारण जोपर्यंत इशायाचा मुलगा पृथ्वीवर आहे तोपर्यंत तू आणि तुझे राज्यही स्थापित होणार नाही. म्हणून आता माणसे पाठवून त्यास माझ्याकडे आण, कारण त्यास खचित मरण पावले पाहिजे.” 32 मग योनाथानाने आपला बाप शौल याला उत्तर देऊन म्हटले, “त्याने कशासाठी मरावे? त्याने काय केले आहे?” 33 तेव्हा शौलाने त्यास मारायला भाला फेकला यावरुन योनाथानाला कळले की, आपल्या वडिलाने दावीदाला जिवे मारण्याचा निश्चय केला आहे. 34 मग योनाथान फार रागे भरून पक्तींतून उठला. महिन्याच्या दुसऱ्या दिवशी त्याने काही अन्न खाल्ले नाही कारण दावीदाविषयी त्यास वाईट वाटले कारण त्याच्या वडिलाने त्याचा अपमान केला. 35 मग असे झाले की, योनाथान सकाळी दावीदाशी नेमेलेल्या वेळी आपल्याबरोबर एक लहान पोर घेऊन रानांत गेला. 36 तो आपल्या पोराला म्हणाला, धाव आता मी बाण मारतो त्याचा शोध कर. पोर धावत असता त्याने त्याच्या पलीकडे बाण मारला. 37 जो बाण योनाथानाने मारला होता त्याच्या ठिकाणावर पोर पोहचला तेव्हा योनाथान पोराच्या मागून हाक मारून बोलला, “बाण तुझ्या पलीकडे आहे की नाही?” 38 योनाथानाने पोराच्या मागून हाक मारली की, “त्वरा कर, धाव, विलंब लावू नको.” तेव्हा योनाथानाचा पोर बाण गोळा करून धन्याकडे आला. 39 मग पोराला काहीच ठाऊक नव्हते योनाथानाला व दावीदाला मात्र गोष्ट ठाऊक होती. 40 योनाथानाने आपली हत्यारे आपल्या पोराला दिली व त्यास म्हटले, “चल ही उचलून घेऊन नगरात जा.” 41 पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपडा पडला व तीन वेळा नमला; तेव्हा ते एकमेकाचे चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले पण दावीद अधीक रडला. 42 योनाथान दावीदाला म्हणाला, “शांतीने जा; कारण आपण दोघांनी परमेश्वराच्या नावाने शपथ वाहून म्हटले आहे की माझ्यामध्ये व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्ये व तुझ्या संतानामध्ये परमेश्वर साक्षी सर्वकाळ असो” मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरात गेला.

Превратите чтение в настоящее изучение

Зарегистрируйтесь, чтобы сохранять стихи, вести заметки и изучать с помощью ИИ.

Выберите следующий шаг после этой главы Продолжайте читать, выберите план или продолжите изучение с AI.
Следуйте темам, которые открывает эта глава Связанные тематические разделы для больших вопросов, которые могла открыть эта глава.