Psalms 64

AI와 함께 이 장 시작하기

이 장에 대해 AI에게 묻기

텍스트에 머물면서 움직임, 긴장, 배경, 그리고 이 장이 더 큰 책 안에서 드러내는 것에 대해 묻습니다.

1 दाविदाचे स्तोत्र हे देवा, माझी वाणी ऐक, माझ्या गाऱ्हाण्याकडे कान दे; माझ्या शत्रूंच्या भीतीपासून माझा जीव सुरक्षित ठेव. 2 वाईट करणाऱ्याच्या गुप्त कारस्थानापासून, अन्याय करणाऱ्याच्या गोंधळापासून मला लपव, 3 त्यांनी आपली जीभ तलवारीसारखी धारदार केली आहे. त्यांनी आपले बाण म्हणजे कडू शब्द मारण्यास नेम धरला आहे. 4 याकरिता ते गुप्त जागेतून जे कोणी निरपराध आहेत त्यांच्यावर मारा करतात; अचानक ते त्यांच्यावर मारा करतात आणि भीत नाहीत; 5 ते आपणाला वाईट योजनेत उत्त्तेजन देतात; ते खाजगीत एकत्रित येऊन सापळा रचण्याचा सल्लामसलत करतात; ते म्हणतात, आपल्याला कोण पाहील? 6 ते पापी योजना शोधून काढतात; ते म्हणतात, आम्ही काळजीपूर्वक योजना समाप्त केली आहे. मनुष्याचे अंतःकरण आणि अंतरीक विचार खोल आहेत. 7 परंतु देव त्यांच्यावर बाण सोडील; अचानक ते त्याच्या बाणाने जखमी होतील. 8 त्यांचीच जीभ त्यांच्याविरुद्ध होऊन ते अडखळविले जातील; जे सर्व त्यांना पाहतील ते आपले डोके डोलवतील. 9 सर्व लोक भितील आणि देवाची कृत्ये जाहीर करतील. ते सूज्ञतेने त्याने जे काही केले त्याविषयी विचार करतील. 10 परमेश्वराच्या ठायी नीतिमान आनंद करतील आणि त्याच्यात आश्रय घेतील; सर्व सरळमार्गी त्याच्यात अभिमान बाळगतील.

읽기를 실제 공부로 바꾸세요

회원가입하고 구절 즐겨찾기, 노트 작성, AI 학습 도구를 사용해 보세요.

이 장 다음의 단계를 선택하세요 계속 읽거나, 계획을 선택하거나, AI와 함께 계속 공부하세요.
이 장이 여는 주제들을 따라가세요 이 장이 열었을 수 있는 더 큰 질문들에 대한 관련 주제 허브.