Numbers 9

AI와 함께 이 장 시작하기

이 장에 대해 AI에게 묻기

텍스트에 머물면서 움직임, 긴장, 배경, 그리고 이 장이 더 큰 책 안에서 드러내는 것에 대해 묻습니다.

1 मिसर देशामधून इस्राएल लोक बाहेर आल्यानंतर दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात परमेश्वर सीनायच्या रानात मोशेबरोबर बोलला. तो म्हणाला, 2 “इस्राएल लोकांस वर्षातील ठरलेल्या वेळी वल्हांडण सण पाळण्यास सांग. 3 या महिन्यात चौदाव्या दिवशी संध्याकाळी त्याच्या नेमलेल्या वेळी तुम्ही तो पाळावा. भोजन करावे. त्याच्या सर्व नियमाप्रमाणे आणि त्याच्या विधीप्रमाणे तो पाळावा.” 4 मग मोशेने इस्राएल लोकांस वल्हांडण सण पाळावयास सांगितले. 5 तेव्हा परमेश्वराने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सीनायच्या रानात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी वल्हांडण सण पाळला; परमेश्वराने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे इस्राएल लोकांनी सर्वकाही केले. 6 त्यादिवशी प्रेताला शिवल्यामुळे काही लोक अशुद्ध झाले. त्यामुळे त्यांना वल्हांडण सण पाळता येईना. ते त्याच दिवशी मोशे व अहरोन ह्यांच्यापुढे गेले. 7 ती माणसे मोशेस म्हणाली, “एका मृत मनुष्यामुळे आम्ही अशुद्ध झालो. इस्राएलाच्या लोकांमध्ये परमेश्वराचे अर्पण वर्षाच्या नेमलेल्या वेळी करण्यापासून आम्हास दूर कां ठेवत आहेस?” 8 मोशे त्यांना म्हणाला, “जरा थांबा, तुम्हाविषयी परमेश्वर काय सूचना देतो, हे मी ऐकतो.” 9 मग परमेश्वर मोशेशी बोलला. तो म्हणाला, 10 तू इस्राएल लोकांशी बोल. म्हण, जर तुमच्यापैकी कोणी किंवा तुम्ही प्रेतामुळे अशुद्ध झाला किंवा लांबच्या प्रवासावर असला, तरी त्याने परमेश्वरासाठी वल्हांडण सण पाळावा. 11 त्यांनी वल्हांडण सण दुसऱ्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी संध्याकाळी साजरा करावा. त्यांनी तो बेखमीर भाकर व कडू भाजीबरोबर खावा. 12 त्यांनी सकाळपर्यंत काहीही शिल्लक ठेवू नये किंवा त्यांनी पशूचे हाड मोडू नये. त्यांनी वल्हांडण सणासाठीचे सर्व नियम पाळावेत. 13 परंतु जर कोणी शुद्ध आहे आणि दूरच्या प्रवासात नाही, पण जो वल्हांडण सण पाळत नाही तर त्यास आपल्या लोकातून काढून टाकावे कारण त्याने परमेश्वराचे अर्पण त्याच्या नेमलेल्या वेळी केले नाही. त्या मनुष्याने आपले पाप वहावे. 14 जर तुमच्यामध्ये एखाद्या परराष्ट्रीय मनुष्य राहतो आणि परमेश्वराच्या सन्मानार्थ वल्हांडण सण पाळतो, तो त्याने पाळावा आणि त्याने दिलेल्या आज्ञा व वल्हांडणाचे सर्व नियम व विधीप्रमाणे पाळून साजरा करावा. परक्यांना आणि तुम्ही देशात जन्मलेल्या सर्वांना सणाचे नियम सारखेच आहेत. 15 ज्या दिवशी निवासमंडप उभा करण्यात आला, निवासमंडपाला, कराराच्या कोशाच्या तंबूला ढगाने झाकले. संध्याकाळी ढग निवासमंडपावर होता. तो सकाळपर्यंत अग्नीसारखा दिसला. 16 अश्याप्रकारे ते सतत होत. ढग निवासमंडपाला झाकी आणि रात्री तो अग्नीसारखा दिसे. 17 जेव्हा ढग तंबूवरून वर घेतला गेला, म्हणजे तेव्हा इस्राएल लोकही त्यांच्या प्रवासास निघत असत. जेव्हा ढग थांबत असे, तेव्हा लोक आपला तळ देत असत. 18 परमेश्वराच्या आज्ञेवरून, इस्राएल लोक प्रवास करीत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे तळ देत. जोपर्यंत ढग निवासमंडपावर थांबत असे, तोपर्यंत ते आपल्या तळात राहत. 19 जेव्हा कधी ढग निवासमंडपावर बरेच दिवस राहत असे, मग इस्राएल लोक परमेश्वराचा नियम पाळून आणि प्रवास करीत नव्हते. 20 काहीवेळेला ढग थोडेच दिवस निवासमंडपावर राहत असे. याबाबतीत, ते परमेश्वराची आज्ञा पाळत ते तेथे तळ देत असत आणि मग ते त्याच्या आज्ञेने पुन्हा प्रवासास निघत. 21 काहीवेळेला ढग संध्याकाळपासून सकाळपर्यंत हजर राहत असे. जेव्हा सकाळी ढग वरती घेतला गेला म्हणजे ते प्रवास करत. जर दिवसा आणि रात्री ढग वर गेले की, ते एकसारखा प्रवास करीत असत. 22 जर ढग निवासमंडपावर दोन दिवस, महिनाभर किंवा वर्षभर राहिला तरी इस्राएल लोक तळ देऊन राहत असत आणि प्रवास करीत नव्हते. पण मग ढग वर गेला म्हणजे ते प्रवासास निघत. 23 परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे ते तळ देत आणि त्याच्या आज्ञेप्रमाणे ते प्रवास करीत; परमेश्वराने मोशेच्याद्वारे दिलेल्या आज्ञा ते पाळीत.

읽기를 실제 공부로 바꾸세요

회원가입하고 구절 즐겨찾기, 노트 작성, AI 학습 도구를 사용해 보세요.

이 장 다음의 단계를 선택하세요 계속 읽거나, 계획을 선택하거나, AI와 함께 계속 공부하세요.
이 장이 여는 주제들을 따라가세요 이 장이 열었을 수 있는 더 큰 질문들에 대한 관련 주제 허브.