Leviticus 12

AI와 함께 이 장 시작하기

이 장에 대해 AI에게 묻기

텍스트에 머물면서 움직임, 긴장, 배경, 그리고 이 장이 더 큰 책 안에서 드러내는 것에 대해 묻습니다.

1 परमेश्वर मोशेला म्हणाला, 2 इस्राएल लोकांस सांग, जर स्त्री गर्भवत होऊन तिला मुलगा झाला तर तिने सात दिवस अशुद्ध रहावे; मासिक पाळीच्या वेळी जशी ती असते तशीच ती अशुद्ध समजावी. 3 आठव्या दिवशी त्या मुलाची सुंता करावी. 4 नंतर त्या स्त्रीला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी तेहतीस दिवस लागतील; त्या मुदतीत तिने कोणत्याही पवित्र वस्तुला शिवू नये व पवित्रस्थानात जाऊ नये. 5 परंतु जर तिला मुलगी झाली तर मासिक पाळीच्या काळात जशी ती असते तसेच तिने चौदा दिवस अशुद्ध रहावे; तिला आपल्या रक्त स्त्रावापासून शुद्ध होण्यासाठी सहासष्ट दिवस लागतील. 6 तिला मुलगा किंवा मुलगी झाल्यावर तिची शुद्धी होण्याची वेळ पूर्ण झाली म्हणजे तिने होमार्पणासाठी एक वर्षाचे कोकरु आणि पापार्पणासाठी पारव्याचे पिलू किंवा होला आणून दर्शनमंडपापाशी याजकाकडे द्यावीत. 7 मग याजकाने ते परमेश्वरासाठी अर्पून तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती आपल्या रक्तस्त्रावापासून शुद्ध होईल; मुलगा किंवा मुलगी झालेल्या स्त्री विषयी हे नियम आहेत. 8 तिला कोकरु अर्पिण्याची ऐपत नसेल तर तिने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले, एक होमार्पणासाठी व दुसरा एक पापार्पणासाठी आणावी मग याजकाने तिच्यासाठी प्रायश्चित करावे म्हणजे ती शुद्ध होईल.

읽기를 실제 공부로 바꾸세요

회원가입하고 구절 즐겨찾기, 노트 작성, AI 학습 도구를 사용해 보세요.

이 장 다음의 단계를 선택하세요 계속 읽거나, 계획을 선택하거나, AI와 함께 계속 공부하세요.
이 장이 여는 주제들을 따라가세요 이 장이 열었을 수 있는 더 큰 질문들에 대한 관련 주제 허브.