2 Kings 8

AI와 함께 이 장 시작하기

이 장에 대해 AI에게 묻기

텍스트에 머물면서 움직임, 긴장, 배경, 그리고 이 장이 더 큰 책 안에서 드러내는 것에 대해 묻습니다.

1 अलीशामुळे जो मुलगा जिवंत झाला होता त्या मुलाच्या आईशी अलीशा बोलला. अलीशा म्हणाला, “तू आपल्या कुटुंबियासह दुसऱ्या देशात जा. कारण परमेश्वर या प्रदेशात दुष्काळ पाडणार आहे. आणि तो सात वर्षे चालेल.” 2 तेव्हा देवाच्या मनुष्याच्या म्हणण्याप्रमाणे तिने केले. पलिष्ट्यांच्या देशात ती आपल्या कुटुंबियांसमावेत जाऊन सात वर्षे राहिली. 3 सात वर्षे उलटल्यावर ती पलिष्ट्यांच्या देशातून परत आली. मग ती राजाला भेटायला निघाली. आपले घरदार आणि जमीन आपल्याला पुन्हा परत मिळावी यासाठी तिला राजाची मदत हवी होती. 4 अलीशा संदेष्ट्याचा सेवक गेहजी याच्याशी राजा बोलत बसला होता. राजा गेहजीला म्हणाला, “अलीशाने जी मोठमोठी कृत्ये केली ती कृपाकरून मला सांग.” 5 अलीशाने एका मृताला पुन्हा जिवंत कसे केले याविषयी गेहजी राजाला सांगत असतानाच जिच्या मुलाला अलीशाने जिवंत केले होते ती स्त्री राजासमोर आली. आपली जमीन आणि घर परत मिळावे यासाठी राजाची मदत मागायला ती आली होती. गेहजी म्हणाला, “स्वामी, हीच ती स्त्री आणि अलीशाने जीवदान दिले तो हाच मुलगा.” 6 राजाने त्या स्त्रीची विचारपूस केली आणि ती राजाशी बोलली. राजाने मग एका कारभाऱ्याला तिच्या मदतीला दिले आणि सांगितले, “तिच्या मालकीचे आहे ते सर्व तिला परत द्या. तसेच, ती हा देश सोडून गेली तेव्हापासून आतापर्यंतचे तिच्या शेतातले उत्पन्न तिला द्या.” 7 अलीशा दिमिष्क येथे गेला. अरामाचा राजा बेन-हदाद तेव्हा आजारी होता. एकाने त्यास सांगितले, “आपल्या इथे एक देवाचा मनुष्य आला आहे.” 8 तेव्हा राजा बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “नजराणा घेऊन त्या संदेष्ट्याच्या भेटीला जा. मी या दुखण्यातून बरा होईन की नाही ते परमेश्वरास विचारायला त्यास सांग.” 9 तेव्हा हजाएल अलीशाच्या भेटीला गेला. दिमिष्कातील उत्तमोत्तम पदार्थाचा नजराणा तो अलीशासाठी घेऊन गेला. या गोष्टी त्याने चाळीस उंटांवर लादल्या होत्या. हजाएल अलीशाकडे जाऊन म्हणाला, “तुमचा शिष्य अरामाचा राजा बेन-हदाद याने मला तुमच्याकडे पाठवले आहे. या दुखण्यातून आराम पडेल का असे त्यांनी विचारले आहे.” 10 तेव्हा अलीशा हजाएलला म्हणाला, “बेन-हदादला जाऊन सांग, ‘तू खात्रीने बरा होशील.’ पण तो मरणार आहे असे खरे म्हणजे परमेश्वराने मला सांगितले आहे.” 11 एवढे बोलून मग देवाच्या मनुष्याने, हजाएलास लाज वाटेपर्यंत त्याच्याकडे टक लावून पाहिले. नंतर अलीशा रडू लागला. 12 हजाएलने त्यास विचारले, “माझ्या स्वामी, तुम्ही का रडत आहात?” अलीशाने सांगितले, “इस्राएलवर तू अत्याचार करणार आहेस हे मला माहित आहे म्हणून मला वाईट वाटते. त्यांची मजबूत नगरे तू जाळशील. आपल्या तलवारीने त्यांची तरुण माणसे कापून काढशील. त्यांच्या लहान मुलांना ठार करशील त्यांच्या गरोदर बायकांना चिरशील.” 13 हजाएल म्हणाला, “मी पडलो कुत्र्यासारखा क्षुद्र मनुष्य एक दुबळामनुष्य या मोठ्या गोष्टी मी कसल्या करणार!” अलीशा म्हणाला, “तू अरामाचा राजा होणार असे परमेश्वराने मला सांगितले आहे.” 14 मग हजाएल तिथून निघाला आणि आपल्या धन्याकडे आला. बेन-हदाद हजाएलला म्हणाला, “अलीशा तुला काय म्हणाला?” हजाएल म्हणाला, “तुम्ही जगणार आहात असे अलीशाने मला सांगितले.” 15 पण दुसऱ्या दिवशी हजाएलने एक रजई घेतली आणि पाण्यात ती भिजवली मग ती बेनहदादच्या तोंडावर टाकली. त्याने बेन-हदाद गुदमरला आणि मरण पावला. अशा प्रकारे हजाएल नवा राजा झाला. 16 यहोशाफाटाचा मुलगा यहोराम यहूदाचा राजा होता. इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीचे पाचवे वर्ष चालू असताना यहोराम इस्राएलच्या राज्यावर आला. 17 त्यावेळी यहोराम बत्तीस वर्षाचा होता. यरूशलेमेवर त्याने आठ वर्षे राज्य केले. 18 पण इस्राएलच्या इतर राजाप्रमाणेच यहोराम वागला. परमेश्वराच्या दृष्टीने गैर अशी कृत्ये त्याने केली. अहाबाच्या घरचे लोक वागत तसाच तो वागला. त्याची पत्नी अहाबाची मुलगी होती. 19 पण परमेश्वराने आपला सेवक दावीद याला वचन दिलेले असल्यामुळे परमेश्वराने यहूद्यांचा नाश केला नाही. दाविदाच्या वंशातीलच कोणीतरी सतत गादीवर येईल असे वचन परमेश्वराने दाविदाला दिले होते. 20 यहोरामाच्या कारकिर्दीत अदोम फितूरी करून यहूदापासून वेगळा झाला. अदोमी लोकांनी स्वत:च राजाची निवड केली. 21 तेव्हा यहोराम आपले सर्व रथ व अधिकाऱ्यास घेऊन साईर येथे गेला. अदोमी सैन्याने त्यास वेढा घातला. यहोराम आणि त्याच्या बरोबरचे लोक यांनी त्यांच्यावर हल्ला चढवला आणि आपली सुटका केली. यहोरामाचे लोक पळाले आणि घरी परतले. 22 अशाप्रकारे अदोमी यहूदाच्या सत्तेपासून वेगळे झाले आणि अजूनही ते तसेच मुक्त आहेत. सुमारास लिब्नानेही बंड केले आणि यहूदापासून ते मुक्त झाले. 23 “यहूदाच्या राजांचा इतिहास” या ग्रंथात यहोरामाने जे जे केले त्याची नोंद आहे. 24 यहोराम मरण पावला आणि दावीद नगरात आपल्या पूर्वजांसोबत त्याचे दफन झाले. यहोरामाचा मुलगा अहज्या मग राज्य करु लागला. 25 इस्राएलचा राजा अहाब याचा मुलगा योराम याच्या कारकिर्दीच्या बाराव्या वर्षी यहोरामाचा मुलगा अहज्या यहूदाचा राजा झाला. 26 त्यावेळी अहज्या बावीस वर्षाचा होता. त्याने यरूशलेमेमध्ये एक वर्ष राज्य केले. त्याच्या आईचे नाव अथल्या. इस्राएलचा राजा अम्री याची ती मुलगी. 27 परमेश्वराने जे करु नये म्हणून सांगितले ते ते अहज्याने केले. तो अहाबाचा जावई होता. त्यामुळे अहाबाच्या घराण्यातल्या लोकांसारखीच त्याची वागणूक होती. 28 अहाबाचा मुलगा योराम यासह अहज्या रामोथ-गिलाद येथे अरामाचा राजा हजाएल याच्यावर चढाई करून गेला. अराम्यांनी योथामाला जखमी केले. 29 आणि रामा येथे योरामाचा राजा हा अरामाचा राजा हजाएल याच्याशी लढत होता, तेव्हा झालेल्या दुखापतीतून बरे होण्यासाठी तो परत इज्रेलास गेला. आणि त्यास भेटायला यहूदाचा राजा यहोराम याचा मुलगा अहज्या खाली इज्रेलला अहाबाचा मुलगा योराम ह्याला पाहायला गेला होता.

읽기를 실제 공부로 바꾸세요

회원가입하고 구절 즐겨찾기, 노트 작성, AI 학습 도구를 사용해 보세요.

이 장 다음의 단계를 선택하세요 계속 읽거나, 계획을 선택하거나, AI와 함께 계속 공부하세요.
이 장이 여는 주제들을 따라가세요 이 장이 열었을 수 있는 더 큰 질문들에 대한 관련 주제 허브.