Joshua 18

Mulai pasal ini dengan AI

Tanyakan AI tentang pasal ini

Tetap di dalam teks dan tanya tentang gerakan, ketegangan, latar belakang, dan apa yang diungkapkan pasal ini dalam kitab yang lebih besar.

1 मग इस्राएलाची सर्व मंडळी शिलो येथे एकत्र झाली, आणि तेथे त्यांनी दर्शनमंडप उभा केला, आणि त्यांच्यापुढे सर्व देश जिंकलेला होता. 2 तरी ज्यांना आपला वतनाचा वाटा मिळाला नव्हता, असे इस्राएलाच्या लोकांपैकी सात वंश राहिले होते. 3 यास्तव यहोशवाने इस्राएलाच्या लोकांस म्हटले, “जो देश तुमच्या पूर्वजांचा देव परमेश्वर याने तुम्हाला दिला, तो आपल्या ताब्यात घेण्यासाठी किती उशीर करणार आहात?” 4 तुम्ही आपल्यासाठी प्रत्येक वंशातली तीन माणसे नेमा; म्हणजे मी त्यांना पाठवीन, आणि त्यांनी देशात जाऊन चोहोकडे फिरून त्यांच्या वतनाच्या विभागाप्रमाणे, वर्णन लिहून माझ्याजवळ आणावे. 5 म्हणजे त्यांनी त्याचे सात वाटे करावे; यहूदाने दक्षिणेस आपल्या सीमेत रहावे, आणि योसेफाच्या घराण्याने उत्तरेस आपल्या सीमेत रहावे. 6 तसे तुम्ही देशाच्या वेगवेगळ्या सात वाट्यांचे वर्णन लिहा आणि ते वर्णन इकडे माझ्याजवळ आणा; मग येथे आपला देव परमेश्वरासमोर मी तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन. 7 लेव्यांना तर तुमच्यामध्ये वाटा नाही; कारण की परमेश्वराचे याजकपण तेच त्यांचे वतन आहे; आणि गाद व रऊबेन व मनश्शेचा अर्धा वंश ह्यांना, यार्देनेच्या पलीकडे पूर्वेला, वतन मिळाले आहे परमेश्वराचा सेवक मोशे याने त्यांना ते दिले आहे. 8 तेव्हा ती माणसे तेथून निघून देशभर फिरली आणि यहोशवाने देशाचे वर्णन करणाऱ्यांना आज्ञा दिली; तो म्हणाला, “देशात चोहोकडे फिरून त्याचे वर्णन लिहा आणि माझ्याकडे परत या. मी येथे शिलोत परमेश्वरासमोर तुमच्यासाठी चिठ्ठ्या टाकीन.” 9 याप्रमाणे ती माणसे जाऊन देशभर फिरली, आणि त्यातील नगरांप्रमाणे त्यांच्या सात विभागाचे वर्णन वहीत लिहून त्यांनी शिलोतल्या छावणीत यहोशवाजवळ आणले. 10 मग यहोशवाने त्यांच्यासाठी शिलोमध्ये परमेश्वरासमोर त्यांच्या नावाच्या चिठ्ठ्या टाकल्या; असा यहोशवाने तेथे तो देश इस्राएलाच्या लोकांस त्यांच्या त्यांच्या वतन भागाप्रमाणे वाटून दिला. 11 तेव्हा बन्यामिनाच्या वंशजांना नेमून दिलेला प्रदेश त्यांच्या कुळांप्रमाणे चिठ्ठी टाकून जो वाटा मिळाला तो असा; त्यांच्या वाट्याची सीमा यहूदाचे वंशज व योसेफाचे वंशज यांच्या मध्यभागी निघाली. 12 म्हणजे उत्तर बाजूला त्यांची सीमा यार्देनेपासून सुरू होऊन यरीहोच्या उत्तरेकडून वर जाऊन, पश्चिमेकडे डोंगरावरून बेथ-आवेनापर्यंत रानात निघते. 13 मग तेथून ती लूज तेच बेथेल येथे पोहचते आणि लूजच्या दक्षिण बाजूकडून निघून खालच्या बेथ-होरोनाच्या दक्षिणेस जो डोंगर त्याकडे अटारोथ-अद्दार येथे निघते 14 तेथून मग पश्चिम सीमा वळसा घेऊन बाजूस बेथ-होरोनाच्या समोरून त्याच्या दक्षिणेस जो डोंगर तेथून यहूदाचे नगर आणि किर्याथ-बाल तोच किर्याथ-यारीम येथे निघते. याची पश्चिम सीमा हीच. 15 दक्षिणेकडील सीमा पश्चिमेला सुरू होऊन बाजू किर्याथ-यारीमाच्या वरच्या टोकापासून निघून नेफ्तोहा झऱ्याकडे जाते. 16 मग ती सीमा हिन्नोमाच्या पुत्राच्या खिंडीसमोरला डोंगर, जो रेफाईमाच्या तळवटीच्या उत्तरेला, त्याच्या काठी उतरली, आणि यबूसी यांच्या दक्षिण भागी हिन्नोम खिंडीत उतरून खाली एन-रोगेलास गेली. 17 मग उत्तरेकडे वळून एन-शेमेशाकडे गेली, आणि अदुम्मीम येथील चढणीच्या समोरल्या गलीलोथाकडे गेली; मग रऊबेनाचा मुलगा बोहन याच्या खडकाकडे जाते. 18 मग ती अराबा याच्या समोरल्या भागी उत्तरेला जाऊन अराबास उतरली. 19 मग ती सीमा बेथ-होग्लाच्या उत्तर दिशेस जाऊन गेली, आणि सीमेचा शेवट क्षारसमुद्राच्या उत्तरेच्या खाडीपर्यंत दक्षिणेकडे यार्देनेच्या मुखापाशी झाला; ही दक्षिण सीमा झाली. 20 आणि पूर्वबाजूला त्याची सीमा यार्देन नदी झाली; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळाप्रमाणे, त्यांच्या चहुकडल्या सीमांप्रमाणे, हे होते. 21 आणि बन्यामीन वंशाला त्यांच्या त्यांच्या कुळाप्रमाणे ही नगरे मिळाली; यरीहो व बेथ-होग्ला व एमेक-केसीस 22 आणि बेथ-अराबा व समाराइम व बेथेल; 23 अव्वीम व पारा व आफ्रा; 24 कफर-अम्मोनी व अफनी व गिबा; अशी बारा नगरे आणि त्यांची गावे; 25 गिबोन व रामा व बैरोथ; 26 मिस्पे व कफीरा व मोजा; 27 रेकेम व इपैल व तरला; 28 सेला, एलेफ व यबूसी म्हणजेच यरूशलेम, गिबाथ, किर्याथ; अशी चवदा नगरे, आणि त्यांची गावे; बन्यामिनाच्या संतानांचे वतन, त्यांच्या कुळांप्रमाणे त्यांचे आहे.

Ubah membaca menjadi studi sungguhan

Daftar untuk menandai ayat, membuat catatan, dan belajar dengan alat bertenaga AI.

Pilih langkah selanjutnya setelah pasal ini Terus membaca, pilih rencana, atau terus belajar dengan AI.
Ikuti tema-tema yang dibuka pasal ini Hub topik terkait untuk pertanyaan-pertanyaan besar yang mungkin dibuka pasal ini.