Isaiah 15

Mulai pasal ini dengan AI

Tanyakan AI tentang pasal ini

Tetap di dalam teks dan tanya tentang gerakan, ketegangan, latar belakang, dan apa yang diungkapkan pasal ini dalam kitab yang lebih besar.

1 मवाबाबद्दलची घोषणा. खरोखर, एका रात्रीत मवाबाचे आर वैराण आणि नाश करण्यात आले; खरोखर एका रात्रीत मवाबाचे कीर वैराण आणि नाश करण्यात आले. 2 दीबोनाचे लोक मंदिरापर्यंत, उच्चस्थानावर रडण्यास चढून गेले; नबो व मेदबा यांच्यासाठी मवाब विलाप करत आहे. त्यांच्या सर्वांची डोकी मुंडिलेली आहेत व त्यांच्या सर्वांच्या दाढ्या कापलेल्या आहेत. 3 ते आपल्या रस्त्यात गोणताट पांघरून आहेत; आपल्या घराच्या धाब्यावर आणि आपल्या चौकात प्रत्येकजण आक्रोश करीत आहेत, अश्रू गाळीत आहेत 4 हेशबोन व एलाले आरोळी मारत आहेत; त्यांचा आवाज याहसापर्यंत ऐकू जात आहे. यामुळे मवाबाचे शस्त्रधारी माणसे आरोळ्या देत आहेत; त्यांचा जीव त्यांच्यात थरथरत आहे. 5 मवाबाकरता माझे हृदय ओरडते; तिचे शरणार्थी सोअर आणि एगलाथ-शलिशीया येथवर पळून गेले आहेत. लूहीथच्या चढणीवर ते रडत रडत चढत आहेत; होरोनाईमाच्या वाटेवर त्यांच्या नाशासाठी मोठ्याने आक्रोश करीत आहेत. 6 पण निम्रीमाचे पाणी आटले आहे; गवत सुकून गेले आहे आणि नवीन गवत नाहीसे झाले आहे; काहीच हिरवे नाही. 7 यास्तव त्यांनी वाढवलेली विपुलता आणि साठवलेले आहे ते, वाळुंजाच्या ओढ्यापलीकडे घेऊन जात आहेत. 8 मवाबाच्या प्रदेशामध्ये सगळीकडे रडणे चालले आहे; त्यांचा आकांत एग्लाइमापर्यंत आणि बैर-एलीमापर्यंत त्यांचा आक्रोश पोहचला आहे. 9 दीमोनाचे पाणी रक्ताने भरले आहेत; पण मी दीमोनावर अधिक जास्त संकटे आणीन. जे मवाबापासून निसटले आहेत आणि जे देशात बाकी आहेत त्यांच्यावर सिंह हल्ला करतील.

Ubah membaca menjadi studi sungguhan

Daftar untuk menandai ayat, membuat catatan, dan belajar dengan alat bertenaga AI.

Pilih langkah selanjutnya setelah pasal ini Terus membaca, pilih rencana, atau terus belajar dengan AI.
Ikuti tema-tema yang dibuka pasal ini Hub topik terkait untuk pertanyaan-pertanyaan besar yang mungkin dibuka pasal ini.