Psalms 22

הישאר בטקסט ושאל על התנועה, המתח, הרקע ומה שהפרק הזה מגלה בתוך הספר הגדול יותר.

1 प्रमुख गायकासाठी अय्येलेथ हाश्शहर (म्हणजे पहाटेची हरिणी) या रागावर बसवलेले दाविदाचे स्तोत्र. माझ्या देवा, माझ्या देवा तू मला का सोडून गेलास? मला तारायला आणि माझ्या वेदनांचा शब्द ऐकायला तू दूर का आहेस? 2 माझ्या देवा, मी तुला दिवसा हाक मारली परंतु तू उत्तर दिले नाहीस, आणि मी रात्रीही गप्प बसलो नाही. 3 तरी तू पवित्र आहेस, जो इस्राएलाच्या स्तवनामध्ये वसतोस. 4 आमच्या पूर्वजांनी तुझ्यावर विश्वास ठेवला. होय देवा, त्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू त्यांना वाचवलेस. 5 देवा आमच्या पूर्वजांनी तुला मदतीसाठी आरोळी केली आणि त्यांना तू सोडवले, त्यांनी तुझ्यावर विश्वास टाकला आणि त्यांची निराशा झाली नाही. 6 परंतू मी किटक आहे, मी मनुष्य नाही, जो मनुष्यांनी निंदिलेला आणि लोकांनी तिरस्कार केलेला आहे. 7 सर्व माझ्याकडे बघणारे माझा उपहास करतात; ते माझा अपमान करतात, ते त्यांचे डोके हलवतात. 8 ते म्हणतात “तो परमेश्वरावर विश्वास ठेवतो, तर परमेश्वर त्यास सोडवो. त्याने त्यास वाचवावे, कारण तो त्याच्याठायी हर्ष पावतो.” 9 परंतु मला उदरांतून बाहेर काढणारा तुच आहेस, मी माझ्या आईच्या स्तनांवर असता, तू मला तुझ्यावर विश्वास ठेवायला शिकवले. 10 मी गर्भातूनच तुझ्यावर सोपवून दिलेला होतो. माझ्या आईच्या उदरात असतानाच तू माझा देव आहेस. 11 माझ्यापासून दूर नको राहू, कारण संकट जवळच आहे. आणि मला मदत करायला कोणीही नाही. 12 खुप बैलांनी मला वेढले आहे, बाशानाच्या बळकट बैलांनी मला वेढले आहे. 13 जसा सिंह आपले तोंड त्याच्या भक्ष्यास फाडण्यास उघडतो, तसे त्यांनी आपले तोंड माझ्या विरूद्ध उघडले आहे. 14 मी पाण्यासारखा ओतला जात आहे, आणि माझी सर्व हाडे निखळली आहेत. माझे हृदय मेणासारखे झाले आहे. जे माझ्या आतल्या आत विरघळले आहे. 15 फुटलेल्या खापराप्रमाणे माझी शक्ती सुकून गेली आहे. माझी जीभ टाळूला चिकटली आहे. तू मला “मृत्यूच्या धुळीत” ठेवले आहे. 16 “कुत्री” मला वेढून आहेत, मला दुष्टांच्या घोळक्यांनी घेरले आहे. त्यांनी माझ्या हातापायाला छेदले आहे. 17 मी माझी सर्व हाडे मोजू शकतो. ते माझ्याकडे टक लावून बघतात. 18 त्यांनी माझे कपडे त्यांच्यात वाटून घेतली आहेत, आणि माझ्या कपड्यांसाठी ते चिठ्‌या टाकतात. 19 परमेश्वरा, मला सोडून जाऊ नकोस तुच माझी शक्ती हो, लवकर ये आणि मला मदत कर. 20 परमेश्वरा माझे आयुष्य तलवारीपासून वाचव, माझे मौल्यवान आयुष्य त्या कुत्र्यांच्या पंज्यापासून वाचव. 21 सिंहाच्या जबड्यापासून माझे रक्षण कर. जंगली बैलाच्या शिंगापासून माझे रक्षण कर. 22 परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझे नाव सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. 23 जे लोक परमेश्वराचे भय धरतात, ते तुम्ही त्याची स्तुती करा! याकोबाच्या सर्व वंशजांनो, त्यास मान द्या! इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. 24 कारण परमेश्वराने संकटात सापडलेल्यांच्या दु:खाला तुच्छ मानले नाही आणि किळस केला नाही. आणि त्यांनी आपले मुख त्यांच्यापासून लपवले नाही. जेव्हा पिडीतांनी त्यास आरोळी केली, त्याने ऐकले. 25 परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करीन. तुझे भय धरणाऱ्यांपुढे मी आपले नवस फेडीन. 26 गरीब लोक खातील आणि समाधानी राहतील. जे लोक परमेश्वरास शोधत आहेत, ते त्याची स्तुती करतील. तुझे हृदय सर्वकाळ जिवंत राहो. 27 सर्व पृथ्वीवरील लोक त्याची आठवण करतील आणि परमेश्वराकडे परत येतील. सर्व राष्ट्रातील कुटूंब तुला नमन करतील. 28 कारण राज्य परमेश्वरचे आहे, तो जगावर अधिकार करणारा आहे. 29 पृथ्वीवरील सर्व समृद्ध लोक भोजन आणि स्तुती करतील. जे आपला जीव वाचवू शकत नाही, जे सर्व धुळीस लागले आहेत, ते त्यास नमन करतील. 30 येणारी पिढी त्याची सेवा करणार. ते त्यांच्या पुढच्या पिढीला प्रभूबद्दल सांगतील. 31 ते येतील आणि जे जन्मतील त्यांना ते त्याचे न्यायीपण प्रगट करतील, ते म्हणतील त्यानेच हे केले आहे.

הפוך קריאה ללימוד ממשי

הירשמו כדי לשמור פסוקים, לרשום הערות וללמוד עם כלי AI.

בחר את הצעד הבא אחרי הפרק הזה המשך לקרוא, בחר תכנית או המשך ללמוד עם AI.
עקוב אחר הנושאים שהפרק הזה פותח מרכזי נושאים קשורים לשאלות הגדולות שהפרק הזה יכול לפתוח.