Hosea 7

הישאר בטקסט ושאל על התנועה, המתח, הרקע ומה שהפרק הזה מגלה בתוך הספר הגדול יותר.

1 जेव्हा मी इस्राएलास आरोग्य देऊ पाहतो, तेव्हा एफ्राईमाचे पाप आणि शोमरोनाची अधमता उघड होते. ते कट रचतात, चोर आत शिरतो, आणि रस्त्यावर लुटारुंची टोळी हल्ला करते. 2 मी त्यांचे दुराचार आठवतो; याची त्यांना त्यांच्या हृदयात जाणीवही नाही, त्यांच्या कृत्यांनी त्यांना घेरले आहे, ते माझ्या मुखासमोर आहे. 3 ते आपल्या वाईटाने राजाला, आणि लबाडीने अधिकाऱ्याला खूश करतात. 4 ते सर्व व्यभिचारी आहेत. जसा भटारी भट्टी पेटवून कनिक भिजवतो; व ते खमिराने फुगत नाही तसे ते आहेत. 5 राजाच्या शुभ दिवशी अधिकारी मद्य पिऊन मस्त झाले; मग त्याने आपला हात थट्टा करणाऱ्यांच्या हाती दिला. 6 भट्टीसारख्या हृदयाने ते कपटी आणि फसव्या योजना करतात. त्यांचा राग रात्रभर अग्नीसारखा धुमसतो, आणि सकाळी धगधगणाऱ्या आग्नीसारखा जळतो. 7 ते सर्व भट्टी सारखे गरम आहेत, ते आपल्या राज्यकर्त्यांस गिळून टाकतात, त्यांचे सर्व राजे पतन पावले आहे, त्यांच्यातील कोणीही माझा धावा करीत नाही. 8 एफ्राईम त्या लोकांसोबत मिसळतो, एफ्राईम न पलटलेल्या भाकरीसारखा झाला आहे. 9 परक्यांनी त्याची ताकद गिळली आहे; पण त्यास हे ठाऊक नाही. त्याचे काही केस पांढरे झाले आहेत, पण ते त्यास माहित नाही. 10 इस्राएलाचा गर्व त्यांच्या विरोधात साक्ष देतो, इतके असूनही ते आपला देव परमेश्वराकडे वळत नाहीत, हे करण्यापेक्षा ते त्यास शोधत नाही. 11 एफ्राईम कबुतरा सारखा भोळा व भावनाहीन आहे, तो मिसराला हाक मारतो, नंतर अश्शूरास उडून जातो. 12 जेव्हा ते जातील, मी आपले जाळे त्यांच्यावर टाकेन, आकाशतल्या पक्षांप्रमाणे मी त्यांना खाली आणिन, लोकांच्या समुदायामध्ये मी त्यांना शिक्षा करीन. 13 हायहाय, त्यांना! कारण ते मजपासून बहकले आहेत. त्यांच्यावर नाश येत आहे! त्यांनी माझ्याविरुध्द फितुरी केली आहे. मी त्यांची सुटका केली असती; पण त्यांनी माझ्या विरोधात लबाडी केली आहे. 14 त्यांनी त्यांच्या हृदयापासून माझा धावा केला नाही, परंतू ते पलंगावर पडून धान्य व नव्या द्राक्षरसासाठी विलाप करतात, ते माझ्यापासून बहकले आहेत. 15 जरी मी त्यास शिक्षण दिले आणि त्यांना बाहूबल दिले, आता ते माझ्या विरोधात कट रचतात. 16 ते परत फिरतात, पण ते मी जो सर्वोच्च देव आहे, त्याकडे फिरत नाही, ते फसव्या धनुष्यासारखे झाले आहेत, त्यांचे अधिकारी आपल्या जिभेच्या उन्मतपणामुळे तलवारीने पाडले जातील, मिसरात त्यांची थट्टा करण्यात येईल.

הפוך קריאה ללימוד ממשי

הירשמו כדי לשמור פסוקים, לרשום הערות וללמוד עם כלי AI.

בחר את הצעד הבא אחרי הפרק הזה המשך לקרוא, בחר תכנית או המשך ללמוד עם AI.
עקוב אחר הנושאים שהפרק הזה פותח מרכזי נושאים קשורים לשאלות הגדולות שהפרק הזה יכול לפתוח.