Hosea 3

Comenzar este capítulo con AI

Pregunta a la IA sobre este capítulo

Mantente en el texto y pregunta sobre el movimiento, tensión, trasfondo y lo que este capítulo revela dentro del libro más amplio.

1 परमेश्वर मला म्हणाला, परत जा, आणि अशा स्त्रीवर प्रेम कर जी दुराचारी असूनही आपल्या पतीस प्रिय आहे. तिच्यावर प्रेम कर जसे मी इस्राएल लोकांवर करतो जरी ते इतर देवतांकडे वळले आणि त्यांना मनुक्याची ढेप प्रिय वाटली. 2 म्हणून मी पंधरा चांदीचे तुकडे व दिड मण जव देऊन तिला माझ्यासाठी विकत घेतले. 3 मी तिला म्हणालो, पुष्कळ दिवस तू माझ्यासोबत राहा; यापुढे तू वेश्या नाहीस किंवा परपुरुषाची नाहीस, त्याचप्रकारे मी पण तुझ्याशी वागेन. 4 कारण इस्राएलचे लोक बरेच दिवस राजा, सरदार, बलीदान, दगडी खांब, एफोद आणि गृहदेवता ह्यांवाचून राहतील. 5 नंतर इस्राएलाचे लोक परत येतील व आपल्या देव परमेश्वर आणि राजा दावीद यांना शोधतील आणि शेवटच्या दिवसात, ते परमेश्वराच्या समोर त्याच्या चांगुलपणात भितीने कापत येतील.

Convierte la lectura en estudio real

Regístrate para guardar versículos, tomar notas y estudiar con herramientas de IA.

Elige tu próximo paso después de este capítulo Sigue leyendo, elige un plan o continúa estudiando con AI.
Sigue los temas que este capítulo abre Centros de temas relacionados para las preguntas más amplias que este capítulo puede haber abierto.