Psalms 113

Start this chapter with AI

Ask AI

Stay in the text and ask about the movement, tension, background, and what this chapter reveals inside the larger book.

1 परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. 2 आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो. 3 सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो. 4 परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो. 5 आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे, 6 जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो, 7 तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो. 8 अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे. 9 अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.

Turn reading into real study

Sign up to bookmark verses, take notes, and study with AI-powered tools.

Choose your next step after this chapter Keep reading, choose a plan, or keep studying with AI.
Follow the themes this chapter opens Related topic hubs for the larger questions this chapter may have opened.