Numbers 30

Mit KI in dieses Kapitel einsteigen

KI zu diesem Kapitel fragen

Bleib im Text und stelle Fragen zu Verlauf, Spannung, Hintergrund und dem, was dieses Kapitel im größeren Buch aufdeckt.

1 मोशे इस्राएलाच्या सर्व वंशप्रमुखांशी बोलला. तो म्हणाला, परमेश्वराने जी काही आज्ञा दिली ती ही आहे. 2 जर एखाद्याने परमेश्वरास नवस केला किंवा शपथपूर्वक स्वतःला वचनाने बंधन घालून घेतले तर त्याने ते मोडू नये. जे त्याच्या मुखातून निघाले ते सर्व वचने त्याने पाळावे. 3 एखादी तरुण स्त्री असून तिच्या वडिलांच्या घरात राहत असेल आणि तिने परमेश्वरास खास वस्तू देण्याचे वचन दिले असेल. 4 जर तिच्या वडिलांनी या वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले तर त्या स्त्रीने वचनाप्रमाणे केले पाहिजे. 5 पण जर तिच्या वडिलांनी वचनाबद्दल ऐकले आणि ते सहमत झाले नाहीत तर ती तिच्या वचनातून मुक्त होईल. परमेश्वर तिला क्षमा करील. 6 आणि ती नवऱ्याकडे असता जर तिचे नवस असले किंवा ज्याकडून तिच्या वडिलांनी तिला मना केले म्हणून परमेश्वर तिला माफ करील. 7 तिच्या नवऱ्याने त्या वचनाबद्दल ऐकले आणि तो त्याच्याशी सहमत झाला तर त्या स्त्रीने वचनाची पूर्तता करावी. 8 पण जर नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि तो सहमत झाला नाहीतर तिला वचन पूर्ण करण्याची गरज नाही. तिच्या नवऱ्याने वचन मोडले. तिने जे सांगितले ते पूर्ण करण्याची त्याने परवानगी दिली नाही म्हणून परमेश्वर तिला क्षमा करील. 9 विधवा किंवा घटस्फोटिता स्त्रीने परमेश्वरास वचन दिले असेल तर तिने वचनाप्रमाणे केले पाहिजे. 10 आणि जर लग्न झालेल्या स्त्रीने आपल्या पतीच्या घरी राहत असता परमेश्वरास काही नवस केला असेल, 11 तिच्या नवऱ्याने ते ऐकून काही बोलला नाही आणि ते पूर्णता करण्याची त्याने तिला परवानगी दिली तर तिचे नवस कायम राहतील. 12 पण जर तिच्या नवऱ्याने वचनाबद्दल ऐकले आणि त्याने तिला त्याप्रमाणे करण्याची परवानगी दिली नाहीतर तिने वचनाप्रमाणे वागण्याची गरज नाही. तिने काय वचन दिले होते त्यास महत्व नाही. तिचा पती वचन मोडू शकतो. तिच्या नवऱ्याने वचन मोडले तर परमेश्वर तिला क्षमा करील. 13 लग्न झालेल्या स्त्रीने परमेश्वरास काही वचन दिले असेल किंवा काही गोष्टी सोडण्याचे वचन तिने दिले असेल किंवा तिने देवाला काही खास वचन दिले असेल. 14 पती यापैकी कोणत्याही वचनाला मनाई करु शकतो. किंवा त्यापैकी कोणत्याही वचनाची पूर्णता करण्याची परवानगी तो देऊ शकतो. 15 पण त्याने ऐकल्यानंतर पुढे ती रद्द केली तर त्याच्या स्त्रीच्या अपराधांची शिक्षा त्याने भोगावी. 16 परमेश्वराने मोशेला या आज्ञा दिल्या. एक पुरुष आणि त्याची पत्नी यांच्याबद्दलच्या आज्ञा आणि वडील व वडीलांच्या घरी राहणारी मुलगी यांच्याबद्दलच्या या आज्ञा आहेत.

Mach aus Lesen echtes Bibelstudium

Registriere dich, um Verse zu speichern, Notizen zu machen und mit KI-gestützten Werkzeugen zu studieren.

Nächste Schritte nach diesem Kapitel Weiterlesen, Plan wählen oder mit KI weiterarbeiten.
Folge den Themen, die dieses Kapitel öffnet Verwandte Themenhubs, wenn dieses Kapitel eine größere Frage geöffnet hat.