Ezekiel 40

Mit KI in dieses Kapitel einsteigen

KI zu diesem Kapitel fragen

Bleib im Text und stelle Fragen zu Verlauf, Spannung, Hintergrund und dem, was dieses Kapitel im größeren Buch aufdeckt.

1 आमच्या बाबेलच्या बंदिवासाच्या पंचविसाव्या वर्षात, वर्षाच्या आरंभी, महिन्याच्या दहाव्या दिवशी, यरूशलेम नगर काबीज झाल्यानंतर साधारण चौदाव्या वर्षी, परमेश्वराचा हात माझ्यावर होता आणि त्याने मला तेथे नेले. 2 दृष्टांतात देवाने मला इस्राएल देशात नेले. मला त्याने खूप उंच पर्वताजवळ ठेवले. त्यावर दक्षिणेकडे नगराची इमारतीसारखे काही होते. 3 मग त्याने मला तेथे आणले. पाहा तेथे पितळेच्या रूपासारखा असा एक मनुष्य होता. त्याच्या हातात मोजमापाची सुती पट्टी व मापण्याची काठी होती. व तो वेशीजवळ उभा होता. 4 तो मनुष्य मला म्हणाला, “मानवाच्या मुला, तू आपल्या डोळ्यांनी पाहा व कानांनी ऐक. आणि मी तुला जे काही दाखवितो त्या सर्वाकडे आपले चित्त लाव, कारण मी ते तुला दाखवावे म्हणून तुला इकडे आणले आहे; जे काही तू पाहतोस ते इस्राएलाच्या घराण्याला प्रगट कर.” 5 मंदिरच्या सभोवतीची भिंत मी पाहिली. त्या मनुष्याच्या हातात मोजपट्टी होती. ती सहा हात लांब होती. हे माप एक हात व चार अंगुले होते. मग त्याने त्या भिंतीची जाडी मोजली. ती एक काठी भरली. मग त्या मनुष्याने भिंतीची उंची मोजली. ती एक काठी भरली. 6 मग तो मनुष्य पूर्वेच्या दाराजवळ गेला. तो पायऱ्या चढला व त्याने दाराचा उंबरठा मोजला. तो एक काठी रुंद होता. दुसरा उंबरठाही तेवढाच रुंद होता. 7 चौकीदाराची खोली एक काठी लांब व रुंदी एक काठी होती. आणि दोन खोल्यांच्या मधील अंतर पाच हात होते. मंदिरासमोरच्या द्वाराच्या द्वारमंडपाजवळील दाराचा उंबरठा एक काठी होता. 8 मग त्याने मंदिरासमोरच्या द्वाराचा द्वारमंडप एक काठी मोजला. 9 मग त्याने द्वारमंडपाचे माप घेतले ते आठ हात लांब भरले. आणि दोन खांब दोन हात मापले, आणि द्वाराचा द्वारमंडप मंदिरासमोर होता. 10 पूर्वेकडील द्वाराच्या या बाजूला व त्या बाजूला तीन तीन चौक्या होत्या. त्या तिन्हीचे माप सारखेच असून दोन्ही बाजूचे खांबही एकाच मापाचे होते. 11 त्या मनुष्याने द्वाराच्या प्रवेशमार्गाची रुंदी दहा हात आणि द्वाराची लांबी तेरा हात होती. 12 त्या चौकांच्या पुढची जागा एका बाजूला एक हात व दुसऱ्या बाजूला एक हात होती. त्या चौक्या दोन्ही बाजूंना सहा सहा हात अशी होती. 13 त्याने एका चौकीच्या छावणीपासून दुसरीच्या छावणीपर्यंतचे दाराचे मोजमाप केले ते दाराला दार धरून पंचवीस हात रुंदी भरली. 14 त्याने साठ हात खांब केले. अंगण खांबापर्यंत द्वाराभोवती होते 15 प्रवेशद्वारापासून आतील द्वाराच्या द्वारमंडपाच्या मुखापर्यंत पन्नास हात होते. 16 त्या चौक्यांना बाजूच्या भिंती आणि द्वारमंडप ह्यांच्यावर लहान अरुंद खिडक्या होत्या. खिडक्यांचा रुंद भाग प्रवेशद्वाराकडे होता. प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूच्या भिंतींवर खजुराची झाडे कोरलेली होती. 17 मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या बाहेरच्या अंगणात आणले. पाहा, तेथे अंगणाच्या सर्व बाजूंना खोल्या असून पदपथ केला होता. पदपथावर तीस खोल्या होत्या. 18 द्वारांच्या दोन्ही बाजूस द्वाराच्या लांबी इतकाच पदपथ रुंद होता. ती खालचा पदपथ होता. 19 मग त्या मनुष्याने खालच्या द्वाराच्या मुखापासून अंगणाच्या मुखापासून बाहेरून पूर्वेला शंभर हात आणि उत्तरेला शंभर हात असे मोजले. 20 मग त्याने बाहेरच्या अंगणाचे जे द्वार उत्तरेकडे होते त्याची लांबी व रुंदीही मोजली. 21 त्याच्या चौक्या या बाजूला तीन व त्या बाजूला तीन होत्या; त्यांचे खांब आणि कमानी ही पहिल्या द्वाराच्या मापाप्रमाणे होत्या; त्यांची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. 22 पूर्वेकडे तोंड असलेल्या द्वाराच्या खिडक्या, व त्याच्या कमानी व त्यांची खजुरीची झाडे द्वारमंडप मापाच्या होत्या. द्वाराला सात पायऱ्या होत्या, त्याने लोक त्यामध्ये चढून जात असत व त्यांच्या कमानी त्यांच्यासमोर होत्या. 23 आतल्या अंगणात पूर्वेकडच्या द्वारासारखे उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते. एका द्वारासमोर उत्तरेकडच्या द्वारासमोर एक द्वार होते. एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत त्याने शंभर हात मोजले. 24 मग त्या मनुष्याने मला दक्षिणेकडे नेले. तो तेथे दक्षिणेकडे एक द्वार होते. त्याने त्यांचे खांब व त्यांच्या कमानी यांच मापल्या त्या पूर्वीच्या इतक्याच भरल्या. 25 आणि त्यास व त्याच्या कमानीस सभोवार याच खिडक्यांसारख्या खिडक्या होत्या; लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात होती. 26 आणि त्यावर चढून जाण्यासाठी सात पायऱ्या होत्या व त्यांच्या कमानी त्यांच्यासमोर होत्या आणि त्यास त्याच्या खांबावर खजुरीची झाडे, एक या बाजूला व एक त्या बाजूला अशी होती. 27 आणि आतल्या अंगणाच्या दक्षिणेला एक दार होते आणि त्याने एका द्वारापासून दुसऱ्या द्वारापर्यंत दक्षिणेकडे शंभर हात मापले. 28 मग त्याने मला दक्षिणेकडील दारातून आतल्या अंगणात आणले, दक्षिणेकडचे दार या मापाप्रमाणे मापले. 29 त्याप्रमाणेच त्याने त्याच्या चौक्या, खांब व त्यावरल्या कमानी ही मापली, ती तेवढीच भरली; त्यास व सभोवतालच्या कमानींना अरुंद खिडक्या होत्या; त्यांची लांबी पन्नास हात व रुंदी पन्नास हात भरली. 30 त्यास सभोवार कमानी होत्या. त्या एकंदर पंचवीस हात लांब, व पाच हात रूंद होत्या. 31 त्याच्या कमानी बाहेरच्या अंगणाच्या बाजूला होत्या; त्याच्या खांबावर खजुरीची झाडे कोरली होती. त्यावर चढून जाण्यास आठ पायऱ्या होत्या. 32 त्या मनुष्याने मला पूर्वेकडून आतल्या अंगणात आणून त्याने दार मोजले. ते इतर दारांच्या मापासारखेच होते. 33 त्याच्या चौक्या, खांब, व कमानी या मापाप्रमाणे त्याने मापल्या; आणि त्यास व कमानीसभोवार खिडक्या होत्या; ते पन्नास हात लांब व पंचवीस हात रुंद होते. 34 त्याच्या कमानी बाहेरच्या अंगणाकडे होत्या; आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुरीची झाडे होती आणि त्याच्या चढणीस आठ पायऱ्या होत्या. 35 मग मला त्या मनुष्याने उत्तरेच्या दाराकडे आणले. त्याने ते मोजले. त्याची मापे इतर दारांप्रमाणेच होती. 36 त्याच्या चौकीच्या खोल्या, त्याचे खांब व त्याच्या कमानी त्याने मापल्या; त्यास सभोवार खिडक्या होत्या; त्याची लांबी पन्नास हात व रुंदी पंचवीस हात होती. 37 आणि त्याचे खांब बाहेरच्या अंगणाकडे होते आणि त्याच्या खांबावर या बाजूला व त्या बाजूला खजुरीची झाडे होती; त्याच्यावर चढून जाण्यास आठ पायऱ्या होत्या. 38 द्वारापाशी खांबाला लागून एकएक खोली असून तिला दार होते. तेथे होमबलि धूत असत. 39 द्वारमंडपाच्या प्रत्येक बाजूला दोन मेजे होती. त्यावर होमार्पण, पापार्पण व दोषार्पण यासाठी आणलेले पशू कापीत असत. 40 बाहेरच्या बाजूस, उत्तरेकडच्या दाराच्या प्रवेशाकडे चढण्याच्या वाटेवर, दोन मेजे होती आणि जे दुसऱ्या बाजूस द्वाराच्या द्वारमंडपाकडे होते त्या तेथेही दोन मेजे होती. 41 द्वाराच्या या बाजूस चार मेजे व त्या बाजूस चार मेजे अशी आठ मेजे होती; त्या आठ मेजावर प्राण्यांना कापीत असत. 42 आणि होमार्पणासाठी ताशीव दगडाची चार मेजे होती. ती दीड हात लांब आणि दीड हात रुंद व एक हात उंच होती. ज्या हत्यारांनी होमबलि व यज्ञपशु कापीत ती या मेजावर ठेवीत असत. 43 सर्व मंदिरात एक वीत लांबीचे आकडे भिंतीवर बसविलेले होते. अर्पण करण्यासाठी आणलेले मांस मेजावर ठेवीत असत. 44 आतल्या द्वाराच्या बाहेरच्या बाजूला जे आतले अंगण उत्तरेकडच्या द्वाराच्या बाजूस होते त्यामध्ये गायकांच्या खोल्या होत्या; त्यांचे तोंड दक्षिणेकडे होते; एक पूर्वेकडील द्वाराच्या बाजूस होते, तिचे तोंड उत्तरेकडे होते. 45 मग तो मनुष्य मला म्हणाला, “दक्षिणेकडे तोंड असलेली ही खोली मंदिरात कामावर असलेल्या याजकाकरिता आहे. 46 पण उत्तरेकडे तोंड असलेली खोली वेदीचे काम करणाऱ्या याजकासाठी आहे. हे सादोकाचे वंशज आहेत, ते लेवीच्या वंशजातून परमेश्वराजवळ त्याची सेवा करायला येतात.” 47 त्याने अंगण शंभर हात लांब व शंभर हात रुंद चौरस मोजले. वेदी मंदिरासमोर होती. 48 मग त्या मनुष्याने मला मंदिराच्या द्वारमंडपापाशी नेले. आणि द्वारमंडपाच्या दोन्ही बाजूंच्या भिंतींचे मोजमाप घेतले. बाजूची प्रत्येक भिंत पाच हात जाड आणि तीन हात रुंद होती. प्रवेशद्वाराची रुंदी चौदा हात होती. 49 द्वारमंडपाची लांबी वीस हात व अकरा हात रुंदी होती. ज्या पायऱ्यांनी लोक त्यावर चढत असत त्यावरून मला नेले, द्वाराच्या खांबापाशी, या बाजूला एक व त्या बाजूला एक असे होते.

Mach aus Lesen echtes Bibelstudium

Registriere dich, um Verse zu speichern, Notizen zu machen und mit KI-gestützten Werkzeugen zu studieren.

Nächste Schritte nach diesem Kapitel Weiterlesen, Plan wählen oder mit KI weiterarbeiten.
Folge den Themen, die dieses Kapitel öffnet Verwandte Themenhubs, wenn dieses Kapitel eine größere Frage geöffnet hat.