1 Chronicles 5

Mit KI in dieses Kapitel einsteigen

KI zu diesem Kapitel fragen

Bleib im Text und stelle Fragen zu Verlauf, Spannung, Hintergrund und dem, was dieses Kapitel im größeren Buch aufdeckt.

1 रऊबेन इस्राएलाचा थोरला पुत्र होता. पण त्याने आपल्या पित्यांचे अंथरूण अशुद्ध केले म्हणून त्याच्या जेष्ठपणाचे अधिकार योसेफाच्या पुत्रांना दिले. म्हणून थोरला पुत्र म्हणून त्याची नोंद नाही. 2 यहूदा आपल्या भावांपेक्षा पराक्रमी होता आणि पुढारीपण त्याच्यापासून आले. पण ज्येष्ठपणाचे अधिकार योसेफाला मिळाले होते. 3 इस्राएलाचा थोरला पुत्र रऊबेन याचे पुत्र हनोख, पल्लू, हेस्रोन आणि कर्मी. 4 योएलाचे वंशज हे होते: योएलाचा पुत्र शमाया होता. शमायाचा पुत्र गोग होता. गोगचा पुत्र शिमी होता. 5 शिमीचा पुत्र मीखा होता. मीखाचा पुत्र राया होता. रायाचा पुत्र बाल होता. 6 बालाचा पुत्र बैरा होता. अश्शूरचा राजा तिल्गथ-पिल्नेसर याने कैद केले. बैरा रऊबेन वंशाचा नेता होता. 7 योएलाचे भाऊ आणि त्यांची घराणी यांची नोंद वंशावळींच्या नोंदीवरुनच येथे केली आहे. ईयेल मुख्य, जखऱ्या, 8 योएलाचा पुत्र शमा याचा पुत्र आजाज याचा पुत्र बेला. नबो आणि बाल-मौन पासून ते अरोएर पर्यंत राहत होते. 9 फरात नदीच्या जवळ अगदी पूर्वेला वाळवंटाच्या कडेपर्यंत त्यांनी वस्ती केली होती. कारण गिलाद प्रांतात त्यांच्या गुरेढोरांची फार वाढ झाली होती. 10 शौलाच्या कारकीर्दीत बेलाच्या लोकांनी हगारी लोकांशी लढाई करून त्यांचा पराभव केला. ते गिलादाच्या पूर्वेकडील सर्व देशात त्यांच्याच तंबूत राहिले. 11 त्यांच्या जवळच गाद घराण्यातील लोक बाशान प्रांतात सलेखा येथपर्यंत राहत होते. 12 योएल हा बाशानाला मुख्यनायक होता. दुसरा शाफाम. मग यानय व शाफाट. 13 त्यांच्या पित्याच्या घराण्यातले त्यांचे नातलग मीखाएल, मशुल्लाम, शबा, योरय, याकान, जीया आणि एबर हे सात. 14 हे अबीहाईलचे वंशज. अबीहाईल हूरीचा पुत्र. हूरी यारोहाचा पुत्र आणि यारोहा गिलादाचा. गिलाद मीखाएलचा. मीखाएल यशीशा याचा पुत्र. यशीशाया यहदोचा पुत्र. यहदो बूजाचा पुत्र. 15 अही हा अब्दीएलचा पुत्र. अब्दीएल गूनीचा पुत्र. अही हा त्या घराण्याचा प्रमुख. 16 ते गिलादात व बाशानाच्या गावात, शारोनच्या गायरानात आपल्या सीमात राहत होते. 17 यहूदाचा राजा योथाम याच्या दिवसात आणि इस्राएलाचा राजा यराबाम यांच्या दिवसात या सर्वांची मोजणी वंशावळ्यांवरून झाली होती. 18 मनश्शेच्या वंशातील अर्धे लोक आणि रऊबेनी व गादी लोकांमधून ढाली, तलवारी, धनुष्यबाण चव्वेचाळीस हजार सातशे साठ सैनिक युध्द शिक्षण घेतलेले होते. 19 हगारी, यतूर, नापीश, नोदाब या लोकांशी त्यांनी लढाया केल्या. 20 आणि ते त्यांच्याशी लढत असता त्यांना साहाय्य मिळाले तेव्हा हगारी व त्यांच्याबरोबरच्या सर्व लोकांचाही त्यांनी पराभव केला. कारण त्यांनी लढाईच्या वेळी देवाला हाक मारली व त्यांनी त्याच्यावर भरवंसा ठेवला होता म्हणून त्याने त्यांना प्रतिसाद दिला. 21 त्यांनी त्यांची जनावरे यासह, पन्नास हजार उंट, दोन लाख पन्नास हजार मेंढरे, दोन हजार गाढवे आणि एक लाख माणसे मिळवले. 22 पुष्कळ शत्रू मारले गेले कारण देव त्यांच्यासाठी लढला. त्यांना कैद करून नेईपर्यंत ते तिथेच राहिले. 23 बाशानापासून बाल-हर्मोन, सनीर आणि हर्मोन डोंगर येथपर्यंत मनश्शेच्या अर्ध्या वंशातील लोकांनी वस्ती केली. तेथे त्यांची संख्या बरीच वाढली. 24 मनश्शेच्या घराण्याचे प्रमुख, एफेर, इशी, अलीएल, अज्रीएल, यिर्मया, होदव्या, यहदीएल, हे सर्व बलवान, धैर्यवान आणि प्रसिध्द पुरुष, आपापल्या घराण्यांचे ते पुढारी होते. 25 पण ते आपल्या पूर्वजांच्या देवाविरुध्द अविश्वासू राहिले. देवाने त्यांच्यासमोरून ज्यांना नष्ट केले होते त्या देशाच्या लोकांच्या देवामागे लागून त्यांनी व्यभिचार केला. 26 इस्राएलाच्या देवाने अश्शूरचा राजा पूल व तिल्गथ-पिल्नेसर याना इर्षेला पेटवले. त्याने मनश्शेचा अर्धा वंश, रऊबेन आणि गाद घराण्यातील लोकांस कैद केले. त्यांना हलह, हाबोर, हारा आणि गोजान नदीजवळ आणले. तेव्हापासून आजपर्यंत ते तेथे राहत आहेत.

Mach aus Lesen echtes Bibelstudium

Registriere dich, um Verse zu speichern, Notizen zu machen und mit KI-gestützten Werkzeugen zu studieren.

Nächste Schritte nach diesem Kapitel Weiterlesen, Plan wählen oder mit KI weiterarbeiten.
Folge den Themen, die dieses Kapitel öffnet Verwandte Themenhubs, wenn dieses Kapitel eine größere Frage geöffnet hat.