John 7

Почати цей розділ з AI

Запитати ШІ про цей розділ

Залишайтеся в тексті та запитуйте про рух, напругу, контекст та що розкриває цей розділ у межах більшої книги.

1 यानंतर येशू गालील प्रांतात फिरू लागला, कारण यहूदी अधिकारी त्यास ठार मारायला पाहत होते. म्हणून त्यास यहूदीया प्रांतात फिरावेसे वाटले नाही. 2 यहूद्यांचा मंडपाचा सण जवळ आला होता. 3 म्हणून त्याचे भाऊ त्यास म्हणाले, “तू इथून नीघ आणि यहूदीया प्रांतात जा, म्हणजे तू करतोस ती तुझी कामे तुझ्या शिष्यांनीही पाहावीत. 4 जो कोणी प्रसिद्ध होऊ पाहतो तो गुप्तपणे काही करत नाही. तू या गोष्टी करीत असशील तर स्वतः जगाला प्रकट हो.” 5 कारण त्याचे भाऊही त्याच्यावर विश्वास ठेवत नव्हते. 6 त्यावरून येशू त्यांना म्हणाला, “सणाला जाण्याची माझी वेळ अजून आलेली नाही; तुमची वेळ तर सर्वदा सिद्ध आहे. 7 जगाने तुमचा द्वेष करवा हे शक्य नाही; पण ते माझा द्वेष करते, कारण मी त्याच्याविषयी साक्ष देतो की, त्यांची कामे वाईट आहेत. 8 तुम्ही सणाला वर जा. मी या सणाला आताच वर जात नाही कारण माझी वेळ अजून पूर्ण झालेली नाही.” 9 असे त्यांना सांगून तो गालील प्रांतात राहिला. 10 पण त्याचे भाऊ सणाला वर गेल्यानंतर तोसुध्दा, उघडपणे न जाता गुप्तपणे वर गेला. 11 तेव्हा, यहूदी त्यास सणात शोधीत होते आणि म्हणत होते, “तो आहे तरी कोठे?” 12 आणि लोकांतही त्याच्याविषयी पुष्कळ कुजबुज सुरू झाली. कोणी म्हणत होते, “तो चांगला आहेः” दुसरे कोणी म्हणत होते, “नाही, तो लोकांस फसवतो.” 13 तरी यहूद्यांच्या भीतीमुळे कोणीही त्याच्याविषयी उघडपणे बोलत नसे. 14 मग सण अर्धा आटोपल्यावर येशू वर परमेश्वराच्या भवनात जाऊन शिक्षण देऊ लागला. 15 तेव्हा यहूदी आश्चर्य करून म्हणू लागले, “शिकल्यावाचून याला विद्या कशी आली?” 16 त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. 17 जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल. 18 जो आपल्या मनाचे बोलतो, तो स्वतःचाच गौरव करतो, परंतु आपणाला ज्याने पाठवले त्याचे गौरव जो पाहतो तो मनुष्य खरा आहे व त्याच्यामध्ये अनीती नाही. 19 मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?” 20 लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?” 21 येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “मी एक कृत्य केले व त्यामुळे तुम्ही सर्व आश्चर्य करता. 22 मोशेने तुम्हास सुंता लावून दिली (तरी ती मोशेपासून नाही, पण पूर्वजांपासून आहे.) आणि तुम्ही शब्बाथ दिवशी मनुष्याची सुंता करता. 23 मोशेचे नियमशास्त्र मोडू नये म्हणून मनुष्याची सुंता जर शब्बाथ दिवशी होते तर, तर मी शब्बाथ दिवशी एका मनुष्यास अगदी बरे केले यामुळे तुम्ही माझ्यावर रागावता काय? 24 तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.” 25 यावरुन यरूशलेमकरांपैकी कित्येकजण म्हणू लागले, “ज्याला ठार मारायला पाहतात तो हाच ना? 26 पाहा, तो उघडपणे बोलत आहे आणि ते त्यास काहीच बोलत नाहीत. हाच ख्रिस्त आहे, हे खरोखर अधिकार्‍यांना कळले आहे काय? 27 तरी हा कुठला आहे हे आम्हास ठाऊक आहे; पण ख्रिस्त येईल तेव्हा तो कोठला आहे हे कोणालाही कळणार नाही.” 28 यावरुन येशू परमेश्वराच्या भवनात शिक्षण देत असता मोठ्याने म्हणाला, “तुम्ही मला ओळखता आणि मी कुठला आहे हे तुम्ही जाणता; तरीही मी आपण होऊन आलो नाही; ज्याने मला पाठवले तो खरा आहे त्यास तुम्ही ओळखत नाही. 29 मी तर त्यास ओळखतो, कारण मी त्याच्यापासून आहे व त्याने मला पाठवले आहे.” 30 यावरुन ते त्यास धरण्यास पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकला नाही, कारण त्याची वेळ अजून आली नव्हती. 31 तेव्हा लोकसमुदायातील पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला व ते म्हणू लागले, “ख्रिस्त येईल तेव्हा याने केलेल्या चिन्हांपेक्षा तो काही अधिक काय करणार आहे?” 32 लोकसमुदाय त्याच्याविषयी अशी कुजबुज करत आहे हे परूश्यांच्या कानावर गेले आणि मुख्य याजक लोक व परूश्यांनी त्यास धरण्यास कामदार पाठवले. 33 यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी आणखी थोडा वेळ तुमच्याबरोबर आहे मग ज्याने मला पाठवले त्याच्याकडे मी निघून जाणार आहे. 34 तुम्ही माझा शोध कराल तरी मी तुम्हास सापडणार नाही आणि जेथे मी असेन तेथे तुम्ही येऊ शकणार नाही.” 35 यामुळे यहूदी आपसात म्हणाले, “हा आपल्याला सापडणार नाही असा हा कोठे जाईल? हा ग्रीकमधील आपल्या पांगलेल्या यहूदी लोकांस जाऊन त्यांस शिकवील काय? 36 हा जे म्हणतो की, ‘तुम्ही माझा शोध कराल आणि मी तुम्हास सापडणार नाही आणि मी असेन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही,’ हे म्हणणे काय आहे?” 37 मग सणाच्या शेवटल्या दिवशी म्हणजे मोठ्या दिवशी, येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, “कोणी तहानलेला असेल तर त्याने माझ्याकडे यावे आणि प्यावे. 38 जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्याच्या अंतःकरणातून शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.” 39 ज्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना जो आत्मा मिळणार होता, त्याच्याविषयी त्याने हे म्हटले. तोपर्यंत पवित्र आत्मा दिलेला नव्हता, कारण अजून येशूचे गौरव झाले नव्हते. 40 लोकसमुदायातील कित्येकजण हे शब्द ऐकून म्हणत होते, “खरोखर, हा तो संदेष्टा आहे.” 41 कित्येक म्हणाले, “हा ख्रिस्त आहे.” दुसरे कित्येक म्हणाले, “ख्रिस्त गालील प्रांतातून येणार आहे काय? 42 दाविदाच्या वंशाचा आणि ज्या गावात दावीद होता त्या बेथलेहेमातून ख्रिस्त येईल अस शास्त्रलेख म्हणत नाही काय?” 43 यावरुन त्याच्यामुळे लोकात फूट झाली. 44 त्यांच्यातील कित्येकजण त्यास धरायला पाहत होते, तरी कोणी त्याच्यावर हात टाकले नाहीत. 45 मग कामदार मुख्य याजकांकडे व परूश्यांकडे आले, तेव्हा ते त्यांना म्हणाले, “तुम्ही त्यास का आणले नाही?” 46 कामदारांनी उत्तर दिले, “कोणीही मनुष्य त्याच्यासारखा कधी बोलला नाही.” 47 तेव्हा परूश्यांनी त्यांना उत्तर दिले, “तुम्हीपण फसलात काय? 48 अधिकार्‍यांपैकी किंवा परूश्यांपैकी कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला आहे काय? 49 पण हा जो लोकसमुदाय नियमशास्त्र जाणत नाही तो शापित आहे.” 50 पूर्वी त्याच्याकडे आलेला आणि त्यांच्यातला एक असलेला निकदेम त्यांना म्हणाला. 51 “एखाद्या मनुष्याचे ऐकण्याअगोदर आणि तो काय करतो याची माहीती करून घेतल्यावाचून आपले नियमशास्त्र त्याचा न्याय करते काय?” 52 त्यांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुम्हीपण गालील प्रांतातले आहात काय? शोधा आणि बघा, कारण गालील प्रांतातून संदेष्टा उद्भवत नाही.” 53 मग ते सर्वजण आपआपल्या घरी गेले.

Перетворіть читання на справжнє вивчення

Зареєструйтеся, щоб зберігати вірші, робити нотатки та вивчати за допомогою ШІ.

Оберіть наступний крок після цього розділу Продовжуйте читати, оберіть план або продовжуйте вивчення з AI.
Слідуйте темами, які відкриває цей розділ Пов'язані тематичні центри для більших запитань, які міг відкрити цей розділ.