Isaiah 20

Почати цей розділ з AI

Запитати ШІ про цей розділ

Залишайтеся в тексті та запитуйте про рух, напругу, контекст та що розкриває цей розділ у межах більшої книги.

1 ज्या वर्षी सेनापती तर्तान अश्दोदास आला, म्हणजे जेव्हा अश्शूराचा राजा सर्गोन याने त्यास पाठवले, त्याने अश्दोदाविरूद्ध लढाई करून ते घेतले. 2 त्या वेळेला आमोजाचा मुलगा यशयाशी परमेश्वर बोलला आणि म्हणाला, “जा व तुझ्या कंबरे पासूनचे गोणपाटाचे वस्त्र काढून टाक व तुझ्या पायातील जोडे काढ.” त्याने तसे केले, तो नग्न व अनवाणी चालला. 3 परमेश्वर म्हणाला, “माझा सेवक यशया ज्याप्रमाणे मिसराविषयी आणि कूशाविषयी चिन्ह व शकुन असा तीन वर्षे नग्न व अनवाणी चालला आहे, 4 त्याप्रमाणे मिसऱ्यांना लाज वाटावी म्हणून अश्शूरचा राजा मिसरच्या कैद्यांना व कूशाच्या तडीपार केलेल्या तरुणांना व वृद्धांना, नग्न आणि अनवाणी आणि त्यांचे कुल्ले उघडे करून नेईल. 5 जो कूश त्यांची आशा आणि जो मिसर देशाचे वैभव त्यामुळे ते हताश व लज्जित होतील.” 6 त्या दिवशी या समुद्रकिनाऱ्यावरील राहणारे लोक म्हणतील, “खरोखर, हा आमच्या आशेचा स्त्रोत, ज्याच्याकडे साहाय्यासाठी व अश्शूराच्या राजापासून रक्षण करण्यासाठी आम्ही पळालो तो असा आहे, तर आम्ही कसे सुटून जाऊ?”

Перетворіть читання на справжнє вивчення

Зареєструйтеся, щоб зберігати вірші, робити нотатки та вивчати за допомогою ШІ.

Оберіть наступний крок після цього розділу Продовжуйте читати, оберіть план або продовжуйте вивчення з AI.
Слідуйте темами, які відкриває цей розділ Пов'язані тематичні центри для більших запитань, які міг відкрити цей розділ.