Ezra 6

Começar este capítulo com AI

Pergunte à IA sobre este capítulo

Fique no texto e pergunte sobre o movimento, tensão, contexto e o que este capítulo revela dentro do livro maior.

1 तेव्हा राजा दारयावेशाने बाबेलच्या ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेण्याचा आदेश दिला. 2 मेदी प्रांतातील अखमथा राजवाड्यात एक गुंडाळी सापडली. तिच्यावर लिहिले होते. 3 “कोरेश राजाच्या कारकिर्दीच्या पहिल्या वर्षी यरूशलेममधील मंदिराच्या बाबतीत राजाने असा आदेश दिला की, जेथे यज्ञ अर्पण करीत त्याठिकाणी देवाचे मंदिर बांधावे. ‘मंदिराचा पाया बांधून काढावा. त्याच्या भिंतीची उंची साठ हात आणि रुंदी साठ हात असावी. 4 मोठ्या दगडांचे तीन थर आणि मोठ्या लाकडाचा एक थर असावा. त्याचा खर्च राजाच्या घरातून केला जावा. 5 देवाच्या घरातील सोन्यारुप्याची पात्रे जी नबुखद्नेस्सराने यरूशलेमेच्या मंदिरातून काढून बाबेलला आणली आहेत ती परत करावी. ती तू यरूशलेमास पाठवावी आणि देवाच्या घरात जमा करावी.’ 6 आता नदीपलीकडील ततनइ, शथर-बोजनइ आणि तुमचे साथीदार अधिकारी जे नदीपलीकडे आहा ते तुम्ही तेथून दूर व्हा. 7 देवाच्या घराचे काम चालू द्या. यहूदी अधिकारी आणि यहूदी वडीलांनी हे देवाचे मंदिर त्याच्या जागी पुन्हा बांधावे. 8 आता माझा आदेश असा आहे. देवाचे मंदिर बांधण्यासाठी यहूदी वडीलजनांसाठी पूर्ण खर्च राजाच्या निधीतून नदीच्या पलीकडील येणाऱ्या खंडणीतून त्या मनुष्यांना देण्यासाठी वापरावा. यासाठी की, त्यांनी त्यांचे काम थांबवू नये. 9 स्वर्गातील देवाच्या होमार्पणासाठी त्या लोकांस जे काही लागेल ते बैल, मेंढे, कोकरे आणि यरूशलेमेमधील याजकांना मागतील तितके गहू, मीठ, द्राक्षरस तेल या वस्तू त्यांना रोजच्या रोज न चुकता द्या. 10 हे करा यासाठी की, त्यांनी स्वर्गातील देवाला अर्पण आणावे आणि राजासाठी, माझ्यासाठी व माझ्या मुलासाठी देवाकडे प्रार्थना करावी. 11 मी तुम्हास आज्ञा करतो की, जो कोणी माझ्या आज्ञेचे उल्लंघन करील त्याच्या घराचे लाकूड काढून त्याच्यावर त्यास टांगावे. त्या अपराधामुळे त्याचे घर कचऱ्याचा ढिग करावा. 12 यरूशलेमेतील देवाच्या या मंदिराचा नाश करण्यास किंवा उल्लंघन करणारा जो कोणी राजा असो किंवा लोक आपले हात लावतील त्यांचा नाश जो देव तेथे राहतो तो करील. मी दारयावेश हा हुकूम करीत आहे. तो पूर्णपणे पाळावा.” 13 नदीच्या पलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती यांनी राजा दारयावेशाच्या आदेशाच्या प्रत्येक गोष्टीचे पालन केले. 14 यहूद्यांचे वडील बांधणीचे काम करीत राहिले. हाग्गय हा संदेष्टा आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे त्यामध्ये त्यांना यश आले. इस्राएलाच्या देवाच्या आज्ञेप्रमाणे आणि पारसाचे राजे कोरेश, दारयावेश व अर्तहशश्त यांच्या आदेशानुसार यांनी मंदिर बांधून पूर्ण केले. 15 हे मंदिर राजा दारयावेशाच्या कारकिर्दीच्या सहाव्या वर्षी अदार महिन्याच्या तृतीयेला पूर्ण झाले. 16 इस्राएल लोकांनी, याजक, लेवी, बंदिवासातून आलेले यांनी देवाच्या मंदिराची प्रतिष्ठापना आनंदाने केली. 17 प्रतिष्ठापनेच्या वेळी त्यांनी शंभर बैल, दोनशे मेंढे, चारशे कोकरे होमात अर्पण केले. तसेच इस्राएलाच्या पापार्पणासाठी बारा बकरेही अर्पण केले. इस्राएलाच्या बारा घराण्यासाठी प्रत्येकी एक असे ते होते. 18 यरूशलेममधील या मंदिराच्या सेवेसाठी त्यांनी मोशेच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे, याजकांची आणि लेव्याची त्यांच्या-त्यांच्या वर्गानुसार योजना केली. 19 बंदिवासातून परत आलेल्या लोकांनी पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवशी वल्हांडण सण पाळला. 20 वल्हांडण सण साजरा करण्यासाठी याजक आणि लेवी यानी एकचित्ताने स्वत:ला शुद्ध केले. कैदेतून आलेल्या सर्व लोकांसाठी व आपल्यासाठी त्यांनी वल्हांडणाचा कोकरा बली दिला. 21 बंदिवासातून परतून आलेल्या समस्त इस्राएल लोकांनी वल्हांडणाचे भोजन केले. इस्राएलाचा देव परमेश्वर याला शोधायला जे देशातील लोकांच्या अशुद्धतेपासून दूर होऊन त्यांच्याकडे आले होते त्यांनी ते खाल्ले. 22 बेखमीर भाकरीचा सण त्यांनी उत्साहाने सात दिवस साजरा केला. कारण देवाच्या, इस्राएलाच्या देवाच्या मंदिराच्या कामात त्यांचे हात मजबूत करायला परमेश्वराने अश्शूरच्या राजाचे मन त्यांच्याकडे फिरवून त्यांना आनंदीत केले.

Transforme leitura em estudo de verdade

Cadastre-se para salvar versículos, fazer anotações e estudar com ferramentas de IA.

Escolha seu próximo passo após este capítulo Continue lendo, escolha um plano ou continue estudando com AI.
Siga os temas que este capítulo abre Hubs de tópicos relacionados para as questões maiores que este capítulo pode ter aberto.