1 Samuel 19

この章をAIで始める

この章についてAIに聞く

テキストに留まり、動き、緊張、背景、そしてこの章がより大きな書の中で何を明らかにするかについて質問してください。

1 यानंतर शौलाने आपला पुत्र योनाथान याला व आपल्या सर्व चाकरांस असे सांगितले की, दावीदाला जिवे मारावे. तथापि शौलाचा पुत्र योनाथान याची दावीदावर फार प्रीती होती. 2 योनाथानाने दावीदाला म्हटले की, “माझा बाप शौल तुला जिवे मारायास पाहत आहे. म्हणून आता सकाळपर्यंत सावध होऊन एकांती लपून राहा. 3 मी जाऊन ज्या शेतात तू आहेस तेथे आपल्या बापाजवळ उभा राहीन आणि तुझ्याविषयी मी आपल्या बापापाशी संभाषण करीन आणि जे पाहीन ते तुला कळवीन.” 4 तेव्हा योनाथानाने आपला बाप शौल याला दावीदाविषयी बरे बोलला आणि तो त्यास म्हणाला की, “राजाने आपला चाकर दावीद याचे वाईट करू नये कारण, त्याने तुमच्यासाठी फार चांगली कृत्ये केली आहेत. 5 त्यानेही आपले शिर हाती घेवून पलिष्ट्याला जिवे मारिले आणि परमेश्वराने अवघ्या इस्राएलासाठी मोठे तारण केले ते तुम्ही ते पाहून हर्षित झाला; तर दावीदाला निष्कारण मारताना निर्दोष रक्त तुम्ही का पाडावे?” 6 तेव्हा शौलाने योनाथानाची विनंती मानली आणि शौलाने अशी शपथ वाहिली, “परमेश्वराची शपथ मी त्यास मारणार नाही.” 7 मग योनाथानाने दावीदाला बोलावले आणि योनाथानाने त्यास या सर्व गोष्टी सांगितल्या. योनाथानाने दावीदाला शौलाजवळ आणले आणि तो त्याच्याजवळ पूर्वीसारखा राहू लागला. 8 यानंतर आणखी लढाई झाली आणि दावीदाने जाऊन पलिष्ट्यांशी लढून त्यांचा फार मोड केला आणि ते त्याच्यापुढून पळाले. 9 मग परमेश्वराचा पासून दुष्ट आत्मा शौलावर आला आणि तो आपला भाला हाती धरुन आपल्या घरी बसला असता दावीद हाताने वाद्य वाजवीत होता. 10 तेव्हा शौलाने भाल्याने दावीदाला भिंतीशी खिळण्यास पाहिले, परंतु तो शौलासमोरून निसटला आणि भाला भिंतीमध्ये घूसला. दावीदाने पळून आपला जीव त्या रात्री वाचवला. 11 मग दावीदावर टपून सकाळी त्यास जिवे मारावे म्हणून शौलाने त्याच्या घरास दूत पाठविले आणि दावीदाची पत्नी हे वर्तमान त्यास सांगून असे बोलली की, “जर आज रात्री आपल्या जिवाचे रक्षण तुम्ही करणार नाही, तर सकाळी तुम्ही जिवे मारले जाल.” 12 तेव्हा मीखलने दावीदाला एका खिडकीतून उतरवले आणि त्याने पळून जावून आपल्या जिवाचे रक्षण केले. 13 मग मीखलने एक मूर्ती घेऊन पलंगावर ठेवली आणि तिच्या डोकीखाली बकऱ्याच्या केसांची उशी ठेवून तीजवर पांघरूण घातले. 14 जेव्हा शौलाने दूत दावीदाला धरायास पाठविले, तेव्हा तिने म्हटले की, “तो दु:खनाईत आहे.” 15 मग शौलाने दावीदाला पाहायास दूत पाठवून म्हटले की, “मी त्यास जीवे मारावे म्हणून त्यास पलंगावर असतानाच माझ्याकडे आणा.” 16 ते दूत घरात आले असता पाहा पलंगावर मूर्ती होती व तिच्या डोकीखाली बकऱ्यांच्या केसांची उशी होती. 17 तेव्हा शौलाने मीखलला म्हटले की, “तू मला का फसविले आणि माझ्या वैऱ्याने निभावून पळून जावे म्हणून त्यास का पाठवून दिले?” मग मीखल शौलाला म्हणाली, “त्याने मला म्हटले की मला जाऊ दे, मी तुला का मारावे?” 18 याप्रमाणे दावीदाने पळून जाऊन आपल्या जिवाचे रक्षण केले. आणि शमुवेलाजवळ रामामध्ये येऊन त्याने आपणाला शौलाने जे सगळे केले होते ते सांगितले; तेव्हा तो व शमुवेल जाऊन नायोथात राहिले. 19 मग शौलाला कोणी असे सांगितले की, पाहा दावीद रामा येथे नायोथात आहे. 20 तेव्हा शौलाने दावीदाला धरायास दूत पाठविले परंतु भविष्यवाद्याची मंडळी भविष्यवाद करीत असता आणि शमुवेल त्यांच्यावर मुख्य आहे हे जेव्हा त्यांनी पाहिले तेव्हा देवाचा आत्मा शौलाच्या दूतांवर आला आणि तेही भविष्यवाद करू लागले. 21 मग हे शौलाला सांगितले असता, त्याने आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. मग शौलाने तिसऱ्या वेळेस आणखी दूत पाठविले, आणि तेही भविष्यवाद करू लागले. 22 तेव्हा तो सुद्धा रामास जायास निघाला आणि सेखूमध्ये एका मोठ्या विहीरीजवळ येऊन त्याने असे विचारिले की, “शमुवेल व दावीद कोठे आहेत?” मग कोणी एकाने म्हटले, “पाहा ते रामातल्या नायोथात आहेत.” 23 तेव्हा शौल रामातल्या नायोथात गेला आणि देवाचा आत्मा त्यावर आला आणि तो जाताना रामातल्या नायोथापर्यंत भविष्यवाद करीत गेला. 24 मग त्यानेही आपली अंगवस्त्रे काढून शमुवेलापुढे भविष्यवाद केला आणि तो संपूर्ण दिवस आणि ती सर्व रात्र तो उघडा पडून राहीला; या कारणास्तव ते म्हणू लागले की, शौलही भविष्यवक्त्यांपैकी आहे की काय?

読むことを本当の学びに変える

登録すると、聖句のブックマーク、ノート作成、AIツールでの学びができます。

この章の後の次のステップを選ぶ 読み続けるか、プランを選ぶか、AIで学習を続けてください。
この章が開くテーマを追う この章が開いたより大きな疑問に関連するトピックハブ。