Numbers 23

ابق في النص واسأل عن الحركة والتوتر والخلفية وما يكشفه هذا الإصحاح داخل السفر الأكبر.

1 बलाम बालाकाला म्हणाला, इथे सात वेद्या बांधा आणि माझ्यासाठी सात बैल आणि सात मेंढे तयार ठेवा. 2 बलामाने सांगितले तसे बालाकाने एक मेंढा व एक बैल प्रत्येक वेदीवर मारला. 3 नंतर बलाम बालाकाला म्हणाला, तू या होमबली जवळ थांब. मी दुसरीकडे जातो. नंतर परमेश्वर माझ्याकडे येईल आणि मी काय बोलायचे ते मला सांगेल. नंतर बलाम उंच जागी गेला. 4 देव त्या जागी बलामाकडे आला आणि बलाम म्हणाला, मी सात वेद्या तयार केल्या आहेत. आणि प्रत्येक वेदीवर मी एकेक मेंढा व बैल बली दिला आहे. 5 नंतर परमेश्वराने काय बोलायचे ते बलामास सांगितले. परमेश्वर म्हणाला, बालाकाकडे परत जा आणि मी सांगतो तेच त्यास जाऊन सांग. 6 तेव्हा बलाम बालाकाकडे परत आला आणि तो आपल्या होमार्पणाजवळ उभा होता आणि मवाबाचे सर्व पुढारी त्याच्याबरोबर होते. 7 नंतर बलामाने आपला संदेश सांगण्यास सुरवात केली आणि म्हणाला, पूर्वेकडील अराम पर्वतावरुन मवाबाचा राजा बालाक याने मला येथे आणले. तो म्हणाला, ये, माझ्यासाठी याकोबाला शाप दे, ये, इस्राएलींना विरोध कर. 8 ज्याला देवाने शाप दिला नाही त्यास मी कसा शाप देऊ? ज्याला परमेश्वराने धमकी दिली नाही त्यास मी कशी धमकी देऊ? 9 मी त्या लोकांस पर्वतावरुन बघू शकतो; मी त्यांना उंच डोंगरावरुन बघतो. पहा, तेथे लोक एकटेच राहत आहे आणि ते स्वतःला सर्वसाधारण राष्ट्रामध्ये गणित नाहीत. 10 इस्राएलाचा केवळ चौथा हिस्सा कोण मोजेल किंवा याकोबाच्या धुळीचे कण कोण मोजू शकेल? मला नीतिमान मनुष्याप्रमाणे मरण येऊ दे, आणि त्यांच्याप्रमाणेच माझ्या जीवनाचा शेवट होऊ दे! 11 बालाक बलामास म्हणाला, तू हे काय केलेस? माझ्या शत्रूंना शाप देण्यासाठी मी तुला येथे आणले. पण पहा, तू तर त्यांना आशीर्वाद दिलास. 12 बलामाने उत्तर दिले व म्हणाला, परमेश्वराने माझ्या मुखात जे घातले, केवळ तेच मी बोलण्याची काळजी घेऊ नये काय? 13 नंतर बालाक त्यास म्हणाला, म्हणून माझ्याबरोबर दुसऱ्या जागी ये. तिथून तुला ह्यातील आणखी बरेच लोक दिसू शकतील. तू त्या सगळ्यांना बघू शकणार नाहीस. पण त्यांचा काही भाग तुला दिसू शकेल. कदाचित त्या जागेवरुन तू त्यांना माझ्यासाठी शाप दे. 14 तेव्हा बालाक बलामास पिसगाच्या माथ्यावरील सोफीमाच्या माळ्यावर घेऊन गेला. तेथे बालाकाने सात वेद्या बांधल्या. नंतर बालाकाने प्रत्येक वेदीवर एक बैल आणि एक मेंढा बली दिला. 15 तेव्हा बलाम बालाकाला म्हणाला, तू येथे आपल्या होमबलीजवळ या वेदीजवळ थांब. मी तिकडे जाऊन देवाला भेटून येतो. 16 परमेश्वर बलामाकडे आला आणि काय बोलायचे ते त्याने त्यास सांगितले. नंतर परमेश्वराने बलामास बालाकाकडे जायला सांगितले. आणि त्याने सांगितलेलेच बोलायला सांगितले. 17 म्हणून बलाम बलाकाकडे परत गेला. बालाक वेदीजवळच उभा होता. मवाबाचे पुढारी होमबलीपाशी उभे होते. बालाकाने बलामास येताना पाहिले. आणि तो म्हणाला, परमेश्वराने काय सांगितले? 18 बलामाने त्याच्या संदेशास सुरवात केली. तो म्हणाला, बालाका, उठ आणि ऐक. तू सिप्पोरेच्या मुला, माझे ऐक, 19 देव मनुष्य नाही, की त्याने खोटे बोलावे, किंवा तो काही मनुष्यप्राणी नाही की, त्याने मन बदलावे. जर त्याने काही वचन दिले तर तो ते केल्याशिवाय राहील काय? तो बोलला आहे मी हे करील तर ते तो पुरे केल्याशिवाय राहील काय? 20 पहा, मी आशीर्वाद द्यायला आज्ञा केली, देवाने आशीर्वाद दिला आणि मी तो उलटा फिरवू शकत नाही. 21 त्यास याकोबात काही कष्ट किंवा इस्राएलात त्रास दिसला नाही. त्यांचा परमेश्वर देव त्यांच्याबरोबर आहे, राजाचा जयघोष त्यांच्यात आहे. 22 देवाने त्यांना मिसर देशातून बाहेर आणले. ते रानबैला इतके शक्तीमान आहेत. 23 याकोबाच्याविरूद्ध मंत्रतंत्र चालणार नाही आणि इस्राएलींना दैवप्रश्र सांगणारे हानी पोचवू शकत नाही, याकोबाविषयी व इस्राएलाविषयी म्हणतील की पहा, देवाने केवढे महान कार्य केले! 24 पहा, लोक सिंहिणीसारखे उठत आहेत, सिंहासारखा बाहेर येतो आणि हल्ला करतो. तो त्याची शिकार खाऊन आणि वधलेल्यांचे रक्त प्यायल्याखेरीज तो खाली बसणार नाही. 25 नंतर बालाक बलामास म्हणाला, तू त्यांना शापहि देऊ नको आणि आशीर्वादहि देऊ नको. 26 बलामाने बालाकाला उत्तर दिले, मी तुला आधीच सांगितले होते की परमेश्वर जे सांगेल तेच मला बोलता येईल. 27 नंतर बालाक बलामास म्हणाला, तेव्हा माझ्याबरोबर दुसऱ्या ठिकाणी ये. कदाचित देव आनंदी होईल आणि तुला त्या लोकांस शाप द्यायची परवानगी देईल. 28 म्हणून बालाक बलामास घेऊन पौर पर्वताच्या माथ्यावर गेला. या पर्वतावरुन वाळवंट दिसते. 29 बलाम बालाकाला म्हणाला, “इथे सात वेद्या बांध. नंतर सात बैल आणि सात मेंढे बली देण्यासाठी तयार कर.” 30 बलामाने सांगितल्याप्रमाणे बालाकाने साऱ्या गोष्टी केल्या. बालाकाने वेदीवर बैल आणि मेंढे बली दिले.

حوّل القراءة إلى دراسة حقيقية

سجّل لحفظ الآيات وتدوين الملاحظات والدراسة بأدوات الذكاء الاصطناعي.

اختر خطوتك التالية بعد هذا الإصحاح استمر في القراءة أو اختر خطة أو استمر في الدراسة مع AI.
تابع المواضيع التي يفتحها هذا الإصحاح مراكز مواضيع ذات صلة للأسئلة الأكبر التي قد يكون فتحها هذا الإصحاح.